सकल गोर बंजारा बांधवानी उपस्थित राहण्याचे आवाहन!
मानोरा (Banjara Society) : बंजारा समाजाच्या आरक्षणाचा (Reservation) हक्क व इतर मागणी संदर्भात दसरानिमित्त उद्या दि. २ ऑक्टोबर रोजी बंजारा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सकल बंजारा गोर बंजारा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देवी-बापू भक्त महंत शेखर महाराज यांनी केले आहे.
पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने या ऐतिहासिक मेळाव्यात सहभागी!
या मेळाव्यात समाजाला हैदराबाद गॅझेट प्रमाणे बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण मिळावे, यासह बंजारा समाजाचे प्रश्न व समस्यावर सखोल चर्चा या दसरा निमित्ताने आयोजित मेळाव्यात करण्यात येणार आहे. यावेळी महंत मंडळी यांच्यासह तज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व बंजारा समाजाचे मान्यवर मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी तसेच विविध संघटनांचे आजी माजी पदाधिकारी (Office Bearer) यांनी मोठ्या संख्येने या ऐतिहासिक मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन महंत शेखर महाराज यांनी केले आहे.
