हिंगोली (Bank employees strike) : सरकारच्या कामगार विरोधी भुमिकच्या विरोधात देशव्यापी संपामध्ये ऑल इंडिया बँकर्स एम्प्लॉयी असोसिएशन संलग्न बँक ऑफ इंडिया व बेँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचार्यांनी बुधवारी संप पुकारला.
देशातील जवळपास १० संघटनाचा सरकारच्या कामगार विरोधी भूमिकेच्या विरोधात देशव्यापी संप पुकारला आहे. यात हिंगोली मध्येही (ऑल इंडिया बँकर्स एम्प्लॉयी अससोसिएशन) संलग्न बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या कर्मचारांनी बुधवार दि.९ जुलै रोजी संप पुकारला असून सर्व कामकाज ठप्प झाले आहे. यामध्ये सहभागी कर्मचार्यांनी बँकापुढे उभे राहून सरकार कामगार विरोधी धोरणविरोधात घोषणाबाजी करुन निषेध नोंदवाला. यावेळी बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी संजय सातव, हर्षद राऊत, सविता सालमोटे, अनिल दहातोंडे, विजय अग्रवाल, नितीन माने तसेच बँक ऑफ महाराष्ट्रचे कोल्हे, अर्चना दोडे, श्रीनिवास तिडके, विलास बांगर आणि गजानन खंदारे उपस्थित होते.