एक आरोपी अटकेत!
परभणी (Banned Jafarani Zarda) : परभणीतील पाथरी शहरात पोलिसांनी (Pathari City Police) मंगळवारी सायंकाळी प्रतिबंधित जाफरानी जर्दा पकडण्याच्या केलेल्या कारवाईनंतर, आता या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिबंधित जर्द्याची बेकायदेशीर वाहतूक करताना संबंधित आरोपीला ताब्यात (Accused in Custody) घेण्यात आले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
सुगंधित तंबाखू स्वतःच्या फायद्यासाठी चोरट्या मार्गाने वाहतूक करून विक्री!
पोलीस उपनिरीक्षक संतोष मरळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींनी शासनाने बंदी घातलेला व कर्करोगासारख्या गंभीर आजारास कारणीभूत ठरणारा सुगंधित तंबाखू (जाफरानी जर्दा) स्वतःच्या फायद्यासाठी चोरट्या मार्गाने वाहतूक करून विक्रीसाठी ठेवला होता. आरोपींना हा पदार्थ आरोग्यास घातक असल्याचे माहिती असूनही त्यांनी जाणीवपूर्वक कायद्याचे उल्लंघन (Violation Of Law) केले.
दोघांविरोधातही गुन्हा दाखल!
या प्रकरणी रामा दगडूबा राखुंडे (रा. देऊळगाव गात, ता. सेलू) याला पोलिसांनी अटक केली असून, राजेश राठी (पूर्ण नाव अपूर्ण) व तिरुपती प्रोव्हिजन, मानवत (संपूर्ण तपशील अपूर्ण) या दोघांविरोधातही गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. पोलिसांनी मंगळवार 8 जुलै रोजी पाथरी शहरात सायंकाळी 06:30 वाजता ही कारवाई (Action) केली होती याप्रकरणी गुन्हा रात्री पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला.
प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड करीत आहेत!
मिळालेल्या मुद्देमालामध्ये 43,200 रुपये किमतीचा सुगंधित जाफरानी जर्दा आणि सुमारे 8 लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन असा एकूण 8 लाख 43 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त (Instead of Confiscation) करण्यात आला आहे. गुन्हा भारतीय दंड संहितेच्या विविध कलमे तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत कलमे लावून दाखल करण्यात आला आहे.




