शौकिनांची दिवसाढवळ्या लुट!
मानोरा (Bar Owner) : मद्य दरवाढ (Liquor Price Hike) धोरण ठरतच असताना सेवा शुल्काच्या नावाने काही बार मालकांनी तब्बल 60 % दरवाढ केल्याने शौकिनांची दिवसाढवळ्या लूट होत असल्याची ओरड सुरू आहे. या लुटीकडे उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे मद्यपी ओरडत आहेत.
नवीन दर अद्याप अस्तित्वात आलेले नाही!
देशात निर्मिती होणाऱ्या विदेशी मद्यवर (Foreign Liquor) अद्याप जुनेच दर असुन, वाईन शॉपीमध्ये (Wine Shop) आजही प्रिंट रेट प्रमाणेच दारूची विक्री (Sale of Liquor) सुरू आहे. दरम्यान, नवीन दर अद्याप अस्तित्वात आलेले नाही. मात्र त्यापूर्वीच तालुक्यातील काही बार मालकांनी (Bar Owner) सेवा शुल्काच्या नावाने 180 एमएलच्या कार्टर (ML Carter) मागे जवळपास 60 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे कालपर्यंत 220 रुपयात 180 एमएलची कार्टर थेट 280 ते 300 रुपयात विकल्या जात आहे.
बार मालकाकडून झिजिया कर आकारून वसूली!
प्रत्यक्षात तालुक्यातील काही बारची अवस्था ही नगण्य स्वरूपाची असुन, त्यांच्याद्वारे प्रदान करण्यात येणारी सेवा नाममात्र आहे. तरी पण बार मालकाकडून झिजिया कर आकारून वसूली केली जात आहे. या प्रकाराकडे उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. यासंदर्भात उत्पादन शुल्क विभागाकडे (Excise Department) माहिती जाणून घेतली असता, सेवा शुल्क (Service Charges) हे त्या बारच्या सेवेनुसार अवलंबून असुन, जो बार जशी सेवा देईल तसा, त्याला दर लावण्याचा अधिकार देण्यात आला आहे. असे यावेळी सांगितले.




