परभणी(Parbhani) :- शेतातील नापिकीमुळे मुलाबाळांचे पालन पोषण कसे करु या चिंतेत वैफल्यग्रस्त होऊन ४० वर्षीय शेतकर्याने विहिरीत उडी मारुन आत्महत्या (Suicide)केली. ही घटना १ जानेवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास राणीसावरगाव येथे घडली. सदर प्रकरणी पिंपळदरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
सुर्यकांत चव्हाण यांनी खबर दिली आहे. भगवान मोतीराम राठोड वय ४० वर्ष, असे आत्महत्या केलेल्या शेतकर्याचे नाव आहे. शेतातील नापिकीमुळे मुलाबाळांचे पालन पोषण कसे करु या चिंतेत वैफल्यग्रस्त होऊन भगवान राठोड यांनी राणीसावरगाव येथील आठवडी बाजारातील सार्वजनिक विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. पिंपळदरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात अली असून तपास पोह. पायघन करत आहेत.