मांडवा येथील घटना
कारंजा/ वाशिम (Farmer Suicide) : सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे तालुक्यातील मांडवा येथील ६० वर्षीय शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून (Farmer Suicide) आत्महत्या केली. ही घटना १ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार, मृतक शेतकरी नागोराव अण्णा पवार यांच्या नावे साडे सहा एकर शेतजमीन आहे. तसेच त्यांच्यावर सेवा सहकारी सोसायटी व सेंट्रल बँकेचे सुमारे ३ लाखापेक्षा अधिक कर्ज आहे. दरम्यान, यंदा त्यांनी शेतात सोयाबीन पेरले होते. मात्र सततच्या पावसामुळे पीक खराब झाले. त्यामुळे कर्ज कसे फेडावे? या विवंचनेतून त्यांनी (Farmer Suicide) शेतातच विषारी द्रव्य प्राशन केले. त्यांनतर ते गावात आले व घरी येताच कोसळले. त्यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. पण येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा विनोद पवार यांच्या फिर्यादीवरून (Karanja Rural Police) कारंजा ग्रामीण पोलिसात मर्ग दाखल करण्यात आला आहे.