बार्शी टाकळी (Barshitakali Aamsabha) : बार्शीटाकळी तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समितीची प्रगती कडे वाटचाल चालू असून वार्षिक आमसभा उत्साहात पार पडली.
बार्शीटाकळी तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती मर्यादित बार्शीटाकळीची 62 सहावी वार्षिक आमसभा (Barshitakali Aamsabha) रविवार दिनांक 14 सप्टेंबरला कार्यालयात आयोजित केली होती. यावेळी मान्यवरांनी सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून हिंदुहृदयसम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे विधिवत पूजन व वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजु पाटील महल्ले, उपाध्यक्ष योगेशराव लाहोडकार, व्यवस्थापक संतोषराव म्हैसने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेशराव बेटकर, माजी अध्यक्ष गजाननराव घुमशे, माजी विलासराव गोरले, उपाध्यक्ष गजाननराव म्हैसने, बाबाराव नानोटे, संचालक सर्वश्री, नारायणराव चव्हाण, सहदेवराव नानोटे, प्रमोदराव भांडवलकर, विनोदराव थुटे, गजाननराव आखरे, चंद्रशेखरराव ठाकरे, सुरेशराव जाधव, गोपालराव भटकर, सुनील भाऊ ढाकोलकर, नवरतनराव कावरे, अशोकराव राठोड, योगेश कोंदनकार, गजाननराव काकड, उमाकांत देशमुख, दत्ता पाटील महल्ले, संस्थेचे कर्मचारी विनोद बेटकर गोपाल काळे व बाळकृष्ण उताणे यांचे सह संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापक संतोष म्हैसणे, संचालक चंद्रशेखर ठाकरे पाटील यांनी संचालन तर आभार प्रदर्शन संस्थेचे कर्मचारी विनोद बेटकर यांनी केले.
संस्थेची प्रगतीकडे वाटचाल
शेतकऱ्यांनी मुंग, उडीद, सोयाबीन व तूर पिकाची विक्री करण्याकरिता शासकीय पोर्टलवर ऑनलाइन स्वरूपात नोंदणी करावी. तसेच नफ्यातून संस्थेच्या जागेवर शॉपिंग सेंटर ची दुकाने बांधण्यात आले असून विद्यमान संचालक मंडळाने वेळोवेळी संस्थेचे व शेतकऱ्यांचे हित जोपासले संस्थेची प्रगतीकडे वाटचाल चालू आहेअसे विचार अनेकांनी आम सभेत बोलताना व्यक्त केले. संस्थेनेसंचालक मंडळाने संस्थेच्या जागेवर शॉपिंग सेंटर उभारले असून संस्थेचे हित जोपासले आहे, शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने पीकविक्री करिता मुंग ,उडीद, सोयाबीन वतूर अशा पिकाची शासकीय पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी. संस्थेची वाट चाल प्रगतीपथावर असल्याचे अनेकांनी विचार व्यक्त करताना आपले मत व्यक्त केले.




