गणपती विसर्जन दरम्यानची घडली दुर्घटना
बारव्हा (Barwha Accident) : गणपती विसर्जन बघण्यासाठी जीर्ण इमारतीवर चढून विसर्जनातील डी. जे. व झाक्यांचा आस्वाद घेत असतानाच अचानक जीर्ण इमारतीचे पोर्च खचून झालेल्या दुर्घटनेत नऊ महिला किरकोळ जखमी झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील (Barwha Accident) बारव्हा येथे आज दि. 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 चे सुमारास घडली. सिमेंटचे पोर्च खाली टिनाचे शेड असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. जखमींमध्ये अनिता राजेंद्र सोनवणे वय 45, मिना टिळ्कशिंग बैस वय 40, नंदिनी सुरेश शेंद्रे वय 30, अर्चना विजय देव्हारे वय 40 रिया रेवाचंद शेंद्रे वय 15 यांचा समावेश असून त्यांना किरकोळ मार लागला आहे.
टिनाचे शेडमुळे मोठी दुर्घटना टळली
बारव्हा पेठ येथे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे वतीने गणेश उत्सव मोठया धुमधडाक्यात मनविण्यात आला. दहा दिवस विविधरंगी कार्यक्रम साजरे करण्यात आले. दि. 18 सप्टेंबर रोजी गणरायाचे विसर्जनासाठी श्रेया धुमाल पार्टीचे डी. जे. व विविधरंगी झाकी, लेझीम च्या तालावर भाविक भक्त थिरकत असतानाच अचानक जीर्ण इमारतीचे छत कोसळले. टिनाचे शेडखाली अनेक महिला उभ्या होत्या. (Barwha Accident) त्यांच्यावर टिनाचे शेड कोसळले. मात्र सिमेंटचे छताखाली टिनाचे शेड असल्यामुळे नऊ महिला किरकोळ जखमी झाल्या. लागलीच जमावाने सर्व टिनाचे शेडच उचलून धरले व जखमींना तात्काळ उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बारव्हा (Barwha Hospital) येथे दाखल करण्यात आले. अनिता रवींद्र सोनवाने, रिया रेवाचन शेंद्रे, नंदिनी सुरेश शेंद्रे, या महिला व मुलींना जास्त मार असल्यामुळे लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.