कर्मचाऱ्यांच्या निवास्थानाकडे अधिकाऱ्यांची पाठ
हिंगोली (Zilla Parishad Employees Residence) : येथील जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या निवास्थानाची अतिशय बकाल अवस्था झाली असून, तुटलेले दारे, खिडक्या, वाढलेले गाजर गवत यामुळे कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून राहण्याची वेळ आली आहे. अधिकारी मात्र निवास्थानाची कामे करण्या एवजी स्वतःच्या दालनाच्या दुरुस्ती कडे मग्न आहेत. मात्र (Zilla Parishad Employees Residence) कर्मचाऱ्यांच्या निवास्थानाकडे लक्ष कोण देणार असा प्रश्न अनुत्तारित आहे.
दरम्यान जिल्हा परिषदेच्या वर्ग एक ते वर्ग चार अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी (Zilla Parishad Employees Residence) जिल्हा परिषद कार्यालयाच्या बाजूलाच निवास्थाने उभारली आहेत. मात्र ही निवास्थाने बांधून जवळ पास तीस पस्तीस वर्षाचा काळ लोटला असून इमारतीची बकाल अवस्था झाली आहे. या निवास्थानात 100 पेक्षा अधिकारी, कर्मचारी राहत आहेत. या इमारतीच्या वर झाडे, झुडपे वाढली आहेत. तर मजबूत रस्ते नसल्याने कर्मचाऱ्यांना चिखलातून रस्ता शोधावा लागतो. आता कोट्यावधी रुपयांचा चुराडा करून काही ठिकाणी सिमेंट रस्ते, नाल्याची व्यवस्था, ड्रेनेज, आदींची कामे थातूर मातुर झाली आहेत.
निवास्थानच्या खिडक्या, दरवाजे मोडकळीस आले असून बदलले जात नाहीत. पाणी ही वेळेवर मिळत नसल्याने (Zilla Parishad Employees Residence) कर्मचारी निवासस्थाने सोडून शहरात इतरत्र रूम घेऊन संसाराचा गाडा चालवत आहेत. मोकळ्या परिसरात झाडे, झुडपे वाढल्याने सरपटणाऱ्या प्राण्याचा सुळसुळाट दिसून येत आहे. यातच अधिकारी, कर्मचारी यांना जीव मुठीत धरून वसाहतीत राहावे लागते. मात्र याकडे जिल्हा परिषदेचे अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे. आता इमारतीची डागडुजी करून देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. आता जिल्हा परिषदेचे सिईओ विवेक गायकवाड लक्ष देतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




