परभणी (Parbhani):- हिवताप (winter fever) विषयी जनजागृती होऊन त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी २५ एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन (winter day) साजरा करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गीते, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रुपेश धमगुंडे यांनी केले आहे.
हिवताप हा डासांमार्फत पसरतो. हा डास स्वच्छ पाण्यामध्ये तयार होतो. डासांची उत्पती रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. सन २०३० पर्यंत हिवताप दुरीकरण करण्याचे ठरविण्यात आले आहे. ही मोहिम १ ते ३० एप्रिल या कालावधित सुरू आहे. जलद ताप सर्व्हेक्षण, गप्पी मासे सोडणे, सांडपाण्याचा निचरा करणे, अबेटिंग खड्डे बुजविणे, कोरडा दिवस पाळणे आदी उपाययोजना केल्या जात आहेत.
अशी आहेत हिवतापाची लक्षणे
थंडी वाजून ताप येणे, हुडहुडी भरणे, एक दिवस आड ताप येणे, अंग दुखणे(Body aches) , उलटी होणे (vomiting), रुग्णास पांघरूण घ्यावयासे वाटणे, व नंतर घाम येऊन ताप कमी होणे अशी लक्षणे हिवतापामध्ये दिसून येतात. वेळीच उपचार घेतल्यास हिवतापाचा धोका टाळता येऊ शकतो. हिवतापाचे वेळेत निदान व उपचार, रक्ताची चाचणी महत्वाची आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून घराभोवती पाणी साचू देऊ नये, पाण्याचे साठे रिकामे करून स्वच्छ करावे, खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, मच्छरदानीचा (Mosquito net) वापर करावा, सांडपाणी निचरा होण्यासाठी शोश खड्डे, परसबाग या सासारख्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.