बारव्हा (Bear attack) : सकाळच्या सुमारास तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या इसमावर (Bear attack) अस्वलिने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास लाखांदूर तालुक्यांतील मुर्झा पारडी येथे घडली आहे. यात रमेश हागरू आंबेडारे वय ६० वर्ष रा.पारडी असे जखमी इसमाचे नाव आहे.
लाखांदूर तालुक्यातील मुर्झा येथील घटना
लाखांदूर तालुक्यात (tendupatta) तेंदुपत्ता संकलन करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याच दरम्यान रमेश आंबेडारे हे तेंदुपत्ता संकलन करत असताना अचानक अस्वलीने त्यांच्यावर हल्ला चढवीत त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत केली आहे. सदर घटना सोबत काम करणार्या मजुरांच्या लक्षात येताच त्यांनी अस्वलाला हाकलून लावले तसेच गंभीर जखमी झालेल्या रमेशला लाखांदूर येथील (Bhandara Hospital) ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचारासाठी आणण्यात आले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्तात्रय ठाकरे यांनी जखमीवर उपचार केले. सदर घटनेची माहिती लाखांदूर वन विभागाला होताच वनपरिक्षेत्र अधिकारी हे जखमीच्या भेटीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले व जखमिला शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
मजुरांनी स्वतःच्या जीवाची काळजी घ्या
दरम्यान, (tendupatta) तेंडूपत्ता संकलन करणार्या मजुरांनी जंगलामध्ये सकाळच्या दरम्यान तेंदूपत्ता तोडण्याकरिता जाऊ नये किंवा जंगलात जातानी समूहाने जावे. पहाटेच किंवा सकाळच्या सुमारास अन्य प्राणी जागृत झालेले असतात. अशावेळी ते हल्ला ही करू शकतात. त्यामुळे मजुरांनी स्वतःच्या जीवाची काळजी घेऊन गटागटात किंवा समूहाने जावे असे आवाहन लाखांदूर वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित यांनी केले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ता मानबिंदू दहिवले व वनरक्षक खंडागळे यांसह नागरिक उपस्थित होते.