कोरेगाव, चोप/गडचिरोली (Bear Attack) : देसाईगंज तालुक्यातील चोप गावातील शेत परिसरात दिवसाढवळ्या अस्वलाचे दर्शन झाले धान पीक कापणी करणाऱ्या महिलांना तालांबळ उडाली तर शेतात ठेपलेल्या केशव मासुरकर यांच्या स्कुटीचे सीट कव्हर फाडून स्कुटीचे नुसकान केले. देसाईगंज तालुक्यातील चोप,कोरेगाव परिसर हा जंगल व्याप्त असून शेजारी पहाडी व नाले असून झुडपी जंगलाने व्यापलेला असल्याने (Bear Attack) जंगली प्राण्यांचे पसंतीचे ठिकाण बनलेले आहे. या अस्वलाचे बऱ्याच वर्षापासून ठाण मांडून परिसरात वावर वावरत आहे.
या वर्षीच्या उन्हाळ्यात भर्रे पहाडी शेतातील परिसरात ऊसशेता शेजारी केशव मासुरकर यांच्या शेतात दोन दिवस सतत अस्वलाचे दर्शन झाले होते. पावसाळ्यात जंगल वाढल्याने अस्वलाला चांगला आश्रय मिळाल्याने ते गाव परीसरात दिसत नव्हती. परंतु आता ध्यान कापणी सुरू झाली व धान पिकातील छोटे मोठे पक्षी प्राण्यांना शिकार बनवण्यासाठी व शेतातील तुरीपिक खाण्यासाठी गाव परिसरात आपला मोर्चा वळवलेला आहे. आज दिनांक 14 नोव्हेंबर च्या दरम्यान दुपारनंतर साडेचारच्या दरम्यान केशव मासुरकर यांच्या शेतात महिला मजूर वर्ग धान कापणी करीत असताना अचानक जंगलातून (Bear Attack) अस्वलाचे शेत परिसरात दर्शन झाल्याने महिला वर्गाची तारांबळ उडाली.
केशव मासुरकर यांची स्कुटी शेतात ठेवली होती अस्वलाने स्कुटीचे सीट फाडून स्कुटी खाली पाडून स्कुटीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले आहे. तरी व महिला वर्गांनी व शेतकरी यांनी आरडा ओरड केल्याने (Bear Attack) अस्वल जंगलाच्या दिशेने पळून गेले. वनविभागाकडून नागरिकांना जंगलात व शेतात धान कापणी व इतर क्षेत्रातील कामे करताना सावधगिरी बाळगावी असे इशारा दिलेला आहे.