गोंदिया (Bears dead) : गोंदिया-बल्लारशाह मार्गावरील सुकडी गाव शिवारातील भुयारी मार्गाजवळ (Bears dead) दोन अस्वल मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या पथकाने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. दरम्यान दोन्ही मृत अस्वलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सविस्तर असे की, (Gondia railway) गोंदिया-बल्लारशाह लोहमार्गावर सुकडी गाव शिवारातील भुयारी मार्गाजवळ दोन अस्वल मृतावस्थेत दिसून आल्या.
रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाल्याचा अंदाज
या घटनेची माहिती मिळताच अर्जुनी मोरगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी एन.डी. खोब्रागडे, प्रकाष्ट निष्काशन अधिकारी एस.जी. अवगान व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनावर पंचनामा करण्यात आला. दरम्यान पशुधन विकास अधिकारी उज्वल बावनथडे यांच्या माध्यमातून मृत पावलेल्या अस्वलांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. या नंतर वनपरिक्षेत्र कार्यालयात नेवून (Bears dead) दोन्ही मृत अस्वलांवर अग्निसंस्कार करण्यात आले.