कारंजा (Washim):- कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या वढवी येथे क्षुल्लक कारणावरून झालेल्या मारहाण (beating) प्रकरणी पोलिसांनी 14 जणांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात वढवी येथील गजानन उद्धवराव वनारसे यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
मुरूम उचलून आरोपीने स्वतःच्या घरासमोर टाकला, या कारणावरून वाद
23 जून रोजी रात्री साडेसात वाजता फिर्यादी, त्याचा मुलगा व आरोपी यांच्यात फिर्यादीच्या घरासमोरील मुरूम उचलून आरोपीने स्वतःच्या घरासमोर टाकला, या कारणावरून वाद झाला. यावेळी आरोपींनी जोडजमाव करून फिर्यादीला शिवीगाळ (abuse) करीत मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली, अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी सुरेश नामदेव जाधव, विष्णू किसन एकनार, प्रमिला सुरेश जाधव, देवकी विष्णू एकनार, संतोष किसन एकनार, रत्नकला आकाराम भांडे, भारत आकाराम भांडे, गोदाबाई किसन एकनार ,लता संतोष एकनार, साधना सुरेश जाधव, भारती रोहन रसाळे, यादव विष्णू एकनार, नरेश विष्णू एकनार व उमेश संतोष एकनार या 14 जणांविरुद्ध भादविच्या कलम 143 , 323, 325 , 504 व 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार प्रवीण खंडारे यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण पोलीस (Rural Police) करीत आहेत.