मंगरूळपीर(Washim):- खावटीच्या दाव्याचे प्रकरण न्यायालयात(Court) दाखल असलेल्या पती आणि पत्नी दरम्यान झालेल्या कौटुंबिक वादातून(family dispute) एकमेकांना मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना 26 जून रोजी मौजे पार्डी ताड येथे घडली या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून मंगरूळपीर पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पती-पत्नी वादात परस्पर विरोधात चार जणांवर गुन्हे दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अर्चना संतोष खताळ वय 28 वर्ष रा. पार्डी ताड यांनी तक्रार (complaint) दिली की फिर्यादी व संतोष खताळ हे पती-पत्नी आहेत त्यांचे न्यायालयात प्रकरण दाखल आहे अशातच 26 जून रोजी दुपारी 12:30 वाजता फिर्यादी घरी हजर असताना सासू सिंधुबाई खताळ हिने फिर्यादीला तू आमच्या घरात राहू नको, असे म्हणत केस धरून खाली पाडले व सासरे भिकाजी खताळ यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली तर पती संतोष खताळ यांनी लोखंडी गजाने मांडीवर पायावर मारून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. आणि चाकू घेऊन मारण्यास आला असता, फिर्यादीने चाकू हातात पकडल्याने डाव्या दंडावर, पोटावर, व हातावर चाकूचे वर्ण उमटले आहे. फिर्यादी च्या तक्रारीवरून मंगरूळपीर पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीला शिवीगाळ करून जीवाने मारण्याची धमकी
तर संतोष खताळ वय 36 वर्षे राहणार पार्डी ताड यांनी तक्रार दिली की फिर्यादी व अर्चना संतोष खताळ हे पती-पत्नी आहेत. त्यांचे न्यायालयात प्रकरण दाखल आहे. अशातच 26 जून रोजी फिर्यादी ड्युटी वरून पार्डी ताड येथे अकरा वाजता घरी गेला तेव्हा त्याची पत्नी अर्चना खताळ ही आधीच घरी हजर होती. त्यामुळे फिर्यादीने तिला तू माझ्या घरी कशी काय आलीस, तू माझ्यावर खावटीचा दावा केला आहे. त्यावर पत्नीने फिर्यादीला हे माझे घर आहे, मी कधी येईल आणि जाईल, असे म्हणत तू जास्त बोलला तर गुंडे आणून तुला मारून टाकीन अशी धमकी दिली, तर घरातून चाकू आणून फिर्यादीच्या डाव्या बोटावर वार केला त्यामुळे फिर्यादीच्या बोटाला जखम होऊन रक्त निघाले तसेच डाव्या पायाला दुखापत झाली. शिवाय, फिर्यादीला शिवीगाळ करून जीवाने मारण्याची धमकी दिली. अशा तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमान्वय गुन्हा (Offense under Sec) दाखल केला आहे. पुढील तपास मंगरूळपीर पोलीस स्टेशन करीत आहे श. प्र.