हिंगोली(Hingoli):- जिल्ह्यातील सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दर महिन्याला दोन लाख रुपये का देत नाही या कारणावरून सभापतीस मारहाण केल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. ज्यामध्ये शिवसेना ठाकरे (Shiv Sena Thackeray)गटाचे जिल्हाप्रमुख तसेच बाजार समितीच्या एका संचालकासह बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा याच प्रकरणात परस्पराविरुद्ध दुसरा गुन्हाही दाखल झाला आहे.
सभापती ठेंगल यांच्यासोबत शाब्दिक वाद करून पैशाची मागणी
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 24 मे रोजी दुपारच्या सुमारास सभापती अशोक दगडूजी ठेंगल हे आलेले असताना त्यांना बाजार समितीचे संचालक वैभव रामराव देशमुख यांनी तू आमच्यामुळे सभापती झाला असून प्रत्येक महिन्याला दोन लाख रुपये आम्हाला का देत नाही या कारणावरून सभापती ठेंगल यांच्यासोबत शाब्दिक बाचाबाची करून पैशाची मागणी केली. त्यानंतर आरोपींनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात गोंधळ घालून सभापती ठेंगल यांना शिवीगाळ केल्यानंतर थापडबुक्याने मारहाण (beating) करण्यात आली. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने सेनगाव पोलिसात सभापती अशोक ठेंगल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कृषी उत्पन्न बाजार( Agricultural produce market) समितीचे संचालक वैभव रामराव देशमुख, जगदीश बालासाहेब देशमुख, माजी नगरसेवक प्रवीण ओमकार आप्पा महाजन, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश बालासाहेब देशमुख, रामराव नारायणराव देशमुख, करण भीमराव देशमुख, अंकुश शंकरराव देशमुख, गोविंद दिनकरराव देशमुख, पांडुरंग किसनराव देशमुख, अभिषेक रामराव देशमुख, प्रदीप गजाननराव देशमुख, अमर सुंदरराव देशमुख यासह इतर काही जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष तांबे हे करीत आहेत.
जीवे मारण्याची धमकी देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन
दरम्यान, याच प्रकरणात संचालक वैभव देशमुख यांनी शुक्रवारी रात्री उशीरा सेनगाव पोलिस ठाण्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैभव रामराव देशमुख यांनी दिलेल्या परस्पराविरुद्धच्या तक्रारीत सभापती अशोक ठेंगल याने तु मला पाच लाख रुपये दिले नाही तर तुझे संचालक पद रद्द करतो असे म्हणत अश्लिल भाषेत शिवीगाळ केली तसेच पेपपरवेट व थापड बुक्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याने सेनगाव पोलिसात सभापती अशोक दगडूजी ठेंगल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुभाष चव्हाण हे करीत आहेत. बाजार समितीमध्ये झालेल्या मारहाणीची मात्र चांगलीच चविष्ट चर्चा रंगत आहे