गोरेगाव(Hingoli) :- येथे सामाजिक पुढाकारामुळे व दान दात्यांच्या लोक वर्गनीतुन गोटवाडी रस्त्यावरील स्मशानभुमी शेडसह परीसराला सुशोभित करण्याचे सेवा कर्तव्य जानकार ज्ञानवतांनी बजावले आहे. इतर सुविधा कार्यान्वित करणे प्रस्तावित असुन या ग्रामहीत कार्याचे नागरीकातुन कौतुक समाधान व्यक्त होत आहे.
ग्रामहीत कार्याचे नागरीकातुन कौतुक समाधान व्यक्त होत आहे
गावात बहुजन समाज कुटुंबाचा रहिवास वाढलेल्या कुटुंब संख्येच्या विस्ताराने लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वधारलेली आहे. गाव अंतर्गत मुलभुत विकासाची प्रक्रिया सुरू असली तरी गावातील मृतकाच्या अंत्यविधी (funeral) विषयाचा प्रश्न स्मशान वैराग्या पुर्ता मर्यादीत पहावयास मिळाला आहे. गावात एकमात्र गोटवाडी रस्त्यावरील स्मशानभुमी शेड वापरात आहे. समाज निहाय स्मशानभुमीच्या वेळोवेळीच्या पाठपुराव्याला मृगजळाचा प्रत्यय आला आहे. स्थानिक ठिकाणी सरकारी गायरान जमिन मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतांना अत्यावश्यक हित विकासाकडे दुर्लक्ष राहले आहे. स्मशानभुमीत मृतकाची हेळसांड न होऊ नये ही निगड लक्षात घेऊन गावातील प्रदीप उद्धवराव पाटील यांनी स्मशानभुमी परीसरातील काटेरी झाडेझुडपे, वाढलेल्या गवताच्या विळख्याचा नायनाट करुन परीसराला सुशोभित करण्यासाठी पुढाकार घेत भागवत नारायण कावरखे, विश्वनाथ बापु पाटील, पंजाब ज्ञानबाराव कावरखे, अशोक कावरखे, जगन्नाथ राजाराम कावरखे आदी गावकऱ्यांच्या सहकार्याने स्मशानभुमीचा कायापालट करण्याचा निर्धार केला होता.
१ लाख २ हजार लोकवर्गणी जमा करुन शेडच्या सभोवताल ५१ सिमेंटचे बेंच
प्रारंभी साफसफाई स्वच्छतेची पुर्णता करत १ लाख २ हजार लोकवर्गणी जमा करुन शेडच्या सभोवताल ५१ सिमेंटचे बेंच कायमस्वरूपी बसवुन बैठक व्यवस्था केली आहे. शेड व बेंच रंगरंगोटीचे निःशुल्क सेवा कार्य नागेश कावरखे यांनी केले आहे. ऐसपैस परीसराने स्मशानभुमी शोभिवंत दिसत आहे. भविष्यात लवकरच विद्युत लाईट (Electric light), कायमस्वरूपी पाणी, वृक्षलागवड, संरक्षीत कंपाऊंड भिंत, प्रवेश गेट आदी आवश्यक कामे करणे प्रस्तावित आहेत. जानकार ज्ञानवतांनी केलेल्या स्वयंस्फूर्ती कार्याची संबधीत प्रशासनाने दखल घेत अधीक स्मशानभुमी शेड उभारण्यास प्रयत्नशीलता दर्शवीने गरजेचे आहे. ग्रामहीत कार्याचे ग्राम नागरीकातुन कौतुक समाधान व्यक्त होत आहे.