शेतकऱ्यांसाठी आणखी 323 कोटी येणार…
बीड (Beed) : 2023 मधील दुष्काळामुळे व सप्टेंबर, ऑक्टोबर 2024 मधील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त 6 लाख 34 हजार शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने (State Govt) एकूण 728 कोटी रुपये अनुदान मंजूर (Grant Approved) केले आहे. त्यापैकी 4 लाख 77 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 445 कोटी रुपये जमा झाले असून, इतरांच्या बँक खात्यावर रक्कम जमा केली जात आहे.
जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बीड जिल्ह्यात 4 लाख 359 हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान (Crop Damage) झाले होते. या नुकसानीपोटी राज्य शासनाने जिल्ह्यातील 6 लाख 13 हजार 963 शेतकऱ्यांसाठी 544 कोटी रुपये, ऑक्टोबरमधील नुकसान भरपाई म्हणून 54 कोटी तसेच 2023 मधील दुष्काळासाठीचे 129 कोटी रुपये अनुदान शासनाने मंजूर केले होते. जानेवारी 2025 पासून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर (Bank Account) अनुदानाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. तत्पूर्वी संबंधित शेतकऱ्यांची केवायसी (KYC) करून घेण्यात आली. त्यानंतरच शेतकऱ्यांना (Farmer) अनुदान वाटपाचा लाभ देण्यात आला.
- 4,00, 359 हेक्टरवरील शेतीपिकांचे जिल्ह्यामध्ये नुकसान झाले होते.
- 6,34,432 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अनुदान मंजूर झालेले आहे.
- निधी जमा 445
- मंजूर निधी 728
एकत्रित अनुदान वाटप!
1) दरम्यान, मदत देण्यापूर्वी नोव्हेंबर 2023 मधील शासन निर्णयानुसार, नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय झाला होता.
2) त्याचप्रमाणे जिल्ह्यात झालेल्या, पीक नुकसानीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांकडून (Divisional Commissioner) निधी मागणी करण्यात आली होती.
3) राज्य शासनाने जिल्ह्यातील 6 लाख 13 हजार 963 शेतकऱ्यांसाठी 544 कोटी रुपये अनुदान मंजूर केले होते.
4) अतिवृष्टी व 2023 मधील दुष्काळामुळे नुकसान असे एकत्रित अनुदान वाटप केले जात आहे.
केवायसी नाही, मग अनुदान नाही!
बीड जिल्ह्यातील 63 हजार 528 शेतकऱ्यांनी आपली केवायसी केली नसल्यामुळे 44 कोटी 93 लाख रुपये अनुदान लटकले आहे. केवायसी केल्याशिवाय संबंधित शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त होणार नाही. त्यामुळे वेळेमध्ये ही प्रक्रिया करुन घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी सेतू, सीएससी किंवा महा ई-सेवा केंद्र (Maha e-Seva Kendra) या ठिकाणी आपली केवायसी करून घेणे गरजेचे आहे.
63528 शेतकऱ्यांची केवायसी अद्यापही बाकी आहे. या शेतकऱ्यांनी तात्काळ केवायसी करुन घेण्याचे आवाहन होत आहे.
अशी आहे स्थिती!
दुष्काळ व अतिवृष्टी नुकसानीपोट 728 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. यामध्ये 634432 शेतकऱ्यांची नावे अपलोड केली होती. त्यापैकी 477410 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 445 को रुपये जमा झाले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच त्यांची केवायसी करणे आवश्यक आहे.
“ज्या शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी केली नाही, त्यांनी वेळेत करून घ्यावी. जेणेकरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त होईल.”
शिवकुमार स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी, बीड