Pune Crime:- विश्वजीतबरोबर का राहता, असे विचारुन आठ ते दहा जणांच्या टोळक्याने दोघा तरुणावर कोयत्याने वार करुन त्यांना जीवे मारण्याचा (Attempt To Kill)प्रयत्न केला. याप्रकरणी उद्देश विलास शिंगारे (वय २७, रा. माळवाडी, वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद दिली. शिंगारे यांच्यासह यश टारगे (वय १९, रा. करण रिहा सोसायटी, वडगाव शेरी) हा तरुणही गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये(Hospital) उपचार करण्यात येत आहेत. ही घटना मंगळवारी रात्री घडली.
विश्वजीत बरोबर का राहतो, असे म्हणून त्यांच्या डोक्यात केले कोयत्याने वार
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंगारे त्यांचे मित्र यश टारगे, विश्वजीत पवार, सिद्धार्थ शेलार, सार्थक धुमाळ व लखन पवार हे गप्पा मारत होते. त्यावेळी चार ते पाच मोटारसायकलवरुन आठ ते दहा जण आले. त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन विश्व्या कोठे आहे, असे विचारुन फिर्यादी यांना विश्वजीत बरोबर का राहतो, असे म्हणून त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला. त्यांनी तो वाचविण्यासाठी हातमध्ये घातला असताना डाव्या हातावर कोयत्याच्या वाराने गंभीर जखमी(wounded) केले. तळहातावर तो वार बसला. फिर्यादीच्या डाव्या पायाच्या गुडघ्यावर कोयता मारुन गंभीर केले. एकाने दुसऱ्या मित्राच्या पाठीवर कोयत्याने वार करुन जखमी केले. जाताना त्यांनी हवेत कोयते फिरवून दहशत निर्माण केला. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक तपास करीत आहेत.