जिल्हाधिकाऱ्यांना कदम यांनी सोपविले निवेदन
अमरावती (Nitin Kadam) : अमरावती जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या व नव्याने होउ घातलेल्या बेलोरा (Belora Airport) येथील विमानतळास कोणा चे नाव द्यावे हा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम (Nitin Kadam) यांनी जिल्हाधिकारी मार्फत पालकमंत्री व विभागीय आयुक्तांना नामांतरासंदर्भात प्रस्ताव सादर केला. सदर नामांतराचा ठराव मंजूर करण्याची मांगणी पत्राद्वारे करण्यात आली.
बेलोरा विमानतळाचे (Belora Airport) सांगायचे झाल्यास हे विमानतळ महाराष्ट्रातील एक आगामी विमानतळ आहे. अमरावती शहराच्या दक्षिणेस 15 किमी (9.3 मैल) आणि अमरावती रेल्वे स्टेशन एकदा कार्यान्वित झाल्यानंतर, हे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी अंतर्गत तिसरे व्यावसायिक विमानतळ असेल. विमानतळ 389 हेक्टर क्षेत्र व्यापते. आणि 1850 मीटर लांबी आणि 45 मीटर रुंदीची धावपट्टी आहे, 08/26 म्हणून नियुक्त केले आहे. यामध्ये 163 मीटर बाय 18 मीटर आकाराचा टॅक्सीवे आणि 100 मीटर बाय 110 मीटर आकारमानाचा एप्रन समाविष्ट आहे. टर्मिनल इमारत 2600 चौरस मीटरमध्ये पसरलेली आहे आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) टॉवर 26 मीटर उंचीवर आहे. सध्या, नाईट लँडिंग सुविधा बसविण्याचे काम चालू आहे.
2010 च्या सुरुवातीला भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आणि 2013 पर्यंत पूर्ण झाली. परंतु निधीअभावी 2019 पर्यंत विकास काम सुरू होऊ शकले नाही. 2019 मध्ये विमानतळाच्या विकासासाठी पायाभरणी करण्यात आली. नियोजित कामामध्ये पहिल्या टप्प्यात 1850 मीटर धावपट्टीचा विस्तार, 110 बाय 120 मीटर एप्रन बांधणे, आयसोलेशन बे आणि टॅक्सी वे आणि नवीन टर्मिनल इमारत यांचा समावेश आहे. ऑगस्ट 2023 पर्यंत, धावपट्टी विस्तार, ऍप्रन आणि टॅक्सीवेची कामे पूर्ण झाली आहेत आणि टर्मिनल इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे. या ठिकाणी एटीआर स्वरूपाची ७२ आसनी विमाने उतरणार आहे. एवढेच नव्हे तर रात्रीच्या वेळी विमाने उतरण्याची सुद्धा व्यवस्था करणार आहेत.
(Belora Airport) बेलोरा विमानतळाचे काम हे अंतिम टप्प्यात आले आहे. तरीही विमानतळाचे उद्घाटन समारंभ काही महिन्यात राहणार आहे.तरी विमानतळाचे नाव हे आपल्या जिल्ह्यातील नामवंत समाजसेवक, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये क्रांति घडविणारे,स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री, (Lok Maharshi Bhausaheb Deshmukh) शिक्षणमहर्षि भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव बेलोरा विमानतळाला देण्यात यावे. या मांगनी साठी संकल्प शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह निवेदन सादर केले.
यासंपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत नितीन कदम (Nitin Kadam) यांनी लवकरच सुरू होत असलेल्या विमानतळाला (Lok Maharshi Bhausaheb Deshmukh) लोकमहर्षि भाऊसाहेब देशमुखांचे नाव द्यावे अशी शासनाला विनंती केली. यावेळी कदम यांच्या समवेत ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय चूनकीकर, पर्वेश कदम, स्वप्निल मालधुरे, मंगेश विरुळकर, प्रणव सहारे,अभिजित सवाई, नितीन ठाकरे,प्रफुल्ल महल्ले, प्रफुल कदम, विलास वायकर, रोशन सनके, सोपान भटकर, परेश मोहोळ, सौरभ चव्हाण, इंद्रजीत नागदिवे, अनिल काळे, गजूभाऊ बिहार, रमेश लढे, प्रविण सुके,बंडू बुरघाटे, व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.