Wardha :- महिला सक्षमीकरण (empowerment) व सामाजिक सुरक्षिततेसाठी शासनाने जाहीर केलेली ठलाडकी बहीण योजनाठ सुरुवातीला महिलांसाठी (Womens) आनंदाची बातमी ठरली. ङ्खमागणी न करता शासनानेच ही योजना दिलीङ्ग असा महिला वर्गाचा सुरुवातीचा आनंद होता. मात्र आता विविध अटी-शर्ती लादून, लाभार्थ्यांची नावे यादीतून कमी करण्याच्या कारवाईने महिलांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
महिलांमध्ये प्रचंड नाराजी
जिल्ह्यात ३ लाख २० हजार ५२९ अर्ज दाखल करण्यात आले होते. परंतु विविध अटी व पात्रतेचे निकष लावून २१ हजार ८९ अर्ज शासनाकडून अपात्र ठरविण्यात आले असून, अजूनही पडताळणीची प्रक्रिया सुरूच आहे. स्थानिक महिलांच्या म्हणण्यानुसार, आम्ही स्वतःहून फार्म भरला नव्हता. आमच्या घरी अंगणवाडी सेविका येऊन फार्म भरून गेल्या. आम्हाला सांगण्यात आले की, ही योजना सर्व पात्र बहिणींना मिळणार आहे. पण आता अचानक नावे वगळून आमचा अपमान केला जात आहे.
सुरुवातीला कोणत्याही विशेष अटींचा उल्लेख नव्हता
योजनेच्या सुरुवातीला कोणत्याही विशेष अटींचा उल्लेख नव्हता. परंतु नंतर अचानक उत्पन्न मर्यादा, कागदपत्रांची गुंतागुंत, पात्रतेचे बदललेले निकष इत्यादी कारणांवरून नावे कमी करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. परिणामी अनेक पात्र महिलांचा हक्क हिरावला जात आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात महिलांच्या भावना उफाळून आल्या असून, स्थानिक पातळीवर आंदोलनाचीही चिन्हे दिसत आहेत. मात्र महिलांच्या मनात निर्माण झालेली नाराजी व अविश्वास पाहता, शासनाने त्वरित या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
