आमगाव (Gondia) :- पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाकरीता 19 जानेवारीला सभापती या पदाकरिता सर्वसामान्य महिला करीत राखीव जागेसाठी निवडणूक (Elections)घेण्यात आले यात श्रीमती योगिता यशवंत पुंड यांची सभापती तर उपसभापती पदावर श्रीमती सुनंदा तेजराम उके यांची निवड करण्यात आले. त्यामुळे भाजपने पंचायत समितीच्या राजकारणात लाडक्या बहिणींना प्राधान्य देऊन महिला राज प्रस्तापित केले.
पंचायत समिती सभापतीपदी श्रीमती योगिता पुंड तर उपसभापती श्रीमती सुनंदा उके
पंचायत समिती आमगाव येथे सभापती पदाकरिता राखीव सर्वसामान्य महिला पद हे आरक्षित होते. भाजप कडे बहुमत असल्याने या पदासाठी तिगांव पंचायत समिती सदस्य श्रीमती योगिता यशवंत पुंड यांच्या नावावर कोर कमिटीने संमती दर्शविली त्यामुळे त्यांचे नामांकन भरण्यात आले. तर उपसभापती पदावर ठाणा गण क्षेत्रातील सदस्य श्रीमती सुनंदा तेजराम उके यांना सहमती देण्यात आले. पंचायत समितीत संख्याबळ नसल्याने वीरोधी पक्षाने निवडणुकीत फार्म भरले नाही. त्यामुळे या पदांची निवड बिनविरोध करण्यात आले.
निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली
सदर निवडणूक निकाल पुढे येताच भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. नवनियुक्त सभापती व उसभापती यांना पुष्पगुच्छ देऊन यावेळी माजी आमदार भेरसिह नागपुरे भाजप जिल्हा अद्यक्ष एड. येशुलाल उपराडे,राजेंद्र पटले, प्रा. सुभाष आकरे, काशीराम हुकरे, माजी जिल्हा परिषद अद्यक्ष विजय शिवणकर,यशवंत मानकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक उत्तम नंदेश्वर, हुकूम बोहरे, धनीराम मटाले, शोभेलाल कटरे, अंजु ताई बिसेन, पूर्व सभापती राजेंद्र गौतम, उपसभापती नोहर चौधरी, यशवंत पुंड, नरेंद्र बाजपेयी,सुधीर पटले, , घनश्याम अग्रवाल, बलदेव चौधरी, रमेश चुटे, अजय बिसेन, नरेंद्र शिवणकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी नवनियुक्त पदाधिकारी यांनी आपले कार्यभार घेत पंचायत समितीचे कार्याला सुरवात केली