नांदेड (Nanded) :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (CM Ladki Bahin Yojna) लाभार्थी महिलेच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होत आहेत. परंतु नांदेड मध्ये अनेक महिलांच्या बँक खात्यात विविध अडचणीमुळे या योजनेचे पैसे जमा झाले नसल्यामुळे ऐन रक्षाबंधना (Rakshabandhan) दिवशी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीणींनी बँकेत गर्दी केलीयं.
रक्षाबंधना दिवशी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीणींनी बँकेत गर्दी केलीयं..
त्यामुळे बँकेत महिलांच्या लांबच – लांब रागा लागल्याच पहायला मिळतयं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळविण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतील पोस्टाचे बँक खाते दिले होते मात्र अनेक महिलांचे बँक खाते बंद पडलेले आहेत तर अनेकांनी ईकेवायसी केली नसल्यामुळे त्यांना अध्याप योजनेचे पैसे मिळाले नाहीत.तर काही महिलांनी जोडबँकेचे खाते नंबर दिल्यामुळे या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत.त्यामुळे ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी ईकेवायसी (E-KYC) करण्यासाठी, नवीन बँक खाते उघडण्यासाठी, पैसे जमा झालेत का नाही, हे चेक करण्यासाठी, बँके खात्याला आधार अपडेट करण्यासाठी नांदेडच्या पोस्ट कार्यालयात मोठी गर्दी करीत असल्याचे चित्र पहायला मिळतय.