परभणी/जिंतूर (crop insurance) : आज जिंतूर-सेलू तालुक्यात मागील वर्षी सन २०२३-२४ वर्षीचा शेतकऱ्यांचा सरसकट पीकविमा (crop insurance) व स्प्रिंकलर व ठिबक गेली दोन वर्षे रखडलेले अनुदान तात्काळ वितरीत करण्यासाठी मा.आ.विजयराव भांबळे व शिष्टमंडळ यांनी आज रोजी जिल्हाधिकारी परभणी यांची भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे मागणी केली.
जिंतूर-सेलू तालुक्यात मागील वर्षी सन २०२३-२४ वर्षीचा शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता २०२३-२४ वर्षीच्या अतिवृष्टी मध्ये अनेक शेतकरी यांच्या हरभरा, कापूस व ईतर सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले होते. त्यातील काही शेतकरी यांचे अनुदान शासनाकडून वाटप सुरु आहे. परंतु, सदर यादीत अनेक लाभार्थी वंचित राहिले आहेत, अनेक शेतकरी यांनी वेळेत (E-pick inspection) ई-पिक पाहणी करून देखील त्यांना लाभापासून वंचित ठेवले आहे. तर अनेक शेतकरी हे २४ तासात ई-पिक पाहणी करू शकले नाहींत त्यांनी ७२ तासापेक्षा जास्त वेळ लागल्याने अनेक शेतकरी वंचित ठेवले आहेत. तर अनेक शेतकरी ई-पिक पाहणी (E-pick inspection) करू शकले नाहीत त्यामुळे अनेक शेतकरी (crop insurance) पिक विमा पासून वंचित राहिले आहेत. सदर शेतकरी यांचे अतोनात नुकसान झालेले असताना देखील ई-पिक पाहणीच्या कठीण प्रोसेसमध्ये शेतकरी अडकल्याने त्यांना पिक विमा मंजूर झाला नाही.
त्यामुळे त्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सरसकट पिक विमा मंजूर करून सर्व शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे. तसेच जिंतूर-सेलू तालुक्यातील अनेक शेतकरी यांनी स्प्रिंकलर व ठिबक च्या सबसीडीचे अनुदान गेली दोन वर्षापासून रखडले आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी सिंचनाखाली याव्यात यासाठी शासनाने चालू केलेल्या योजनेमुळे अनेक लाभार्थी यांनी स्वःखर्चाने स्प्रिंकलर व ठिबक विकत घेऊन जमिनी ओलिताखाली आणल्या आहेत. परंतु, सदर योजनेचे केंद्र सरकाचे गेली दोन वर्षाचे अनुदान रखडलेले असल्याने अनेक शेतकरी आर्थिक आडचणीत आले आहेत त्यामुळे स्प्रिंकलर व ठिबक या दोन्ही योजनेचे मागील दोन वर्षाचे केंद्रसरकारचे रखडलेले अनुदान तात्काळ मागवून वितरीत करण्यात यावे, अशा मागणीचे लेखी निवेदन यावेळी देण्यात आले.
यावेळी मा.आ.विजयराव भांबळे, विश्वनाथ राठोड, रामराव उबाळे, दशरथ तूपसुंदर, मनीषाताई केंद्रे, गणेशराव इलग, आप्पासाहेब डख, लिंबाजीराव ईखे, सचिन राऊत, अभिजित भांबळे ई उपस्थित होते.