मानोरा(Washim):- मानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गट ग्राम पंचायत एकलारा येथील १४ कुडाच्या घरात राहणाऱ्या बेघर कुटुंबाला पंतप्रधान (Prime Minister) आवास घरकुल योजनेचा लाभ द्यावा, असे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ग्राम पंचायत सदस्य बाबाराव संजय चव्हाण यांनी दिले आहे.
मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मौजे एकलारा येथील देवकाबाई राठोड, नंदा राठोड, काशीराम चव्हाण, द्वारकाबाई चव्हाण, ताईबाई राठोड, येनाबाई चव्हाण, मैनाबाई चव्हाण, संतोष होनाले, नारायण गाढवे, सुरेखा राठोड, सायत्रा राठोड, कैलास राठोड, मंजुळा चव्हाण, रोहिदास राठोड आदी १४ गरजू बेघर कुटुंबाला पंतप्रधान आवास घरकुल योजनेच्या लाभाची गरज आहे. वरील गरीब कुटूंब कुडाच्या घरात वास्तव्य करीत आहेत. त्यामुळे बेघराना सुविधा देणेकरीता घरकुलाचा लाभ द्यावा, अशी मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.