भाग्यरथा शिखरे ठरली सर्वोत्कृष्ठ आशा तर दिपीका देशपांडे ठरली गटप्रवर्तकाची मानकरी
हिंगोली (Asha Swayamsevak) : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागा मार्फत बुधवार १५ जानेवारी रोजी जिल्ह्यात उत्कृष्ट आरोग्य सेवा देणार्या आशा, तालुका स्तरीय आशा, गटप्रवर्तक यांचा सत्कार केला जातो यामध्ये जिल्हास्तरीय आशा म्हणून भाग्यरथा शिखरे तर गटप्रवर्तक म्हणून दीपिका देशपांडे यांचा रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या षटकोणी सभागृहात बुधवारी सर्वोत्कृष्ट (Asha Swayamsevak) आशा स्वयंसेविका गट प्रवर्तक २०२३-२४ पुरस्काराचा वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात आशा स्वयंसेविकाचा प्रथम पुरस्कार भांडेगाव येथील भाग्यरथा शेळके यांना तर द्वितीय अनिता जळके, तृतीय पुरस्कार वंदना लेकुळे यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या सीईओ नेहा भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कैलास शेळके, समाज कल्याण अधिकारी ऐडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, डॉ.सतिश रुणवाल, अनिता चव्हाण, वडकुते, शंकर तावडे, मारोती एंगडे, अजरअली सय्यद, डॉ.सुनिल देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. आशा स्वयंसेविका पुरस्कारात हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथील भाग्यरथा शेळके यांना पाच हजार रुपयांचा रोख प्रथम पुरस्कार मिळाला तीन हजार रुपयांचा. द्वितीय पुरस्कार भांडेगाव येथील अनिता जळके यांना तर दोन हजाराचा तृतीय पुरस्कार औंढा तालुक्यातील पिंपळदरी येथील वंदना लेकुळे यांनी प्रदान करण्यात आला.
तालुका स्तरीय आशा पुरस्कारात औंढा तालुका प्रथम, तीन हजार, द्वितीय दोन हजार तृतीय एक हजार असे स्वरुप होते यामध्ये प्रथम सोनाली खंदारे, द्वितीय लोहरा येथील मणकर्णा खुडे, तृतीय पिंपळदरी येथील वैशाली ढगे यांना प्रदान करण्यात आला. वसमत तालुक्यातील प्रथम कुरूंदा येथील निता गायकवाड, द्वितीय पांगरा शिंदे येथील मिरा पोटे तृतीय गिरगाव येथील प्रेमिला पोटे यांना प्रदान करण्यात आला. हिंगोली तालुक्यातील प्रथम नर्सी येथील प्रणाली खंदारे, द्वितीय हिंगोली शहरातील मस्तानशहा नगर येथील श्रीवंता बरगे तृतीय नर्सी येथील निता जयस्वाल यांना प्रदान करण्यात आला. (Asha Swayamsevak) कळमनुरी तालुक्यातून प्रथम मचक्ता खुडे, द्वितीय बाळापूर येथील मनिषा पंडित, तृतीय रामेश्वर तांडा येथील संघप्रिया नरवाडे यांना प्रदान करण्यात आला.
सेनगाव तालुक्यातून प्रथम साखरा येथील सुचिता पांडे, द्वितीय साखरा येथील सीमा पांडे, तृतीय कवठा येथील नयना बेंगाळ यांना प्रदान करण्यात आला. दरम्यान, जिल्हा स्तरीय गटप्रवर्तक प्रथम पुरस्कार अडीच हजार हिंगोली तालुक्यातील नर्सी येथील दिपीका देशपांडे, द्वितीय दिड हजार कळमनुरी तालुक्यातील. बाळापूर येथील रेणुका देशपांडे तर तृतीय एक हजार वसमत तालुक्यातील टेंभुर्णी येथील दिपाली पडोळे यांना देण्यात आला आहे.