अजित पवारांकडून क्रीडा मंत्र्यांचे तोंडभरून कौतुक
बालाजी कवठेकर
उदगीर (Udgir MLA Sanjay Bansode) : उदगीरच्या इतिहासातील सर्वात ‘बेस्ट’ आमदार, ज्यांनी हजारो कोटीची विकासकामे केली, ते राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे आहेत. असे तोंडभरून कौतुक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उदगीरचे आमदार संजय बनसोडे (MLA Sanjay Bansode) यांचे उदगीर येथे आयोजित जनसन्मान यात्रेत केले. यावेळी, मंचावर कृषी मंत्री धनंजय मुंडे, आ.विक्रम काळे, आ.बाबासाहेब पाटील, उपस्थित होते.
मागचे बिल द्यायचे नाही, आणि पुढचे बिल भरायचे नाही म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी उदगीर येथील जाहीर सभेत शेतकऱ्यांची मने जिंकली. माय माउलींनो काळजी करू नका.. लाडकी बहिण योजना कधीच बंद होणार नाही. चंद्रसूर्य असेपर्यंत कुणीच भारताचे संविधान बदलू शकणार नाही, बार्टीच्या धर्तीवर आर्टी व मार्टी सारख्या योजना सुरू केल्या. त्यामुळे तळागाळातील जनतेला मोठा लाभ होणार आहे. अशी खूप कामे केले राहिलेले कामही आम्हीच करू, असे आश्वासन उदगीर मतदारसंघातील जनतेला राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले.
संजय बनसोडे (MLA Sanjay Bansode) यांनी माझ्याकडून उदगीरसाठी जे मागितले ते मी त्यांना दिले. आता त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या पूर्ण करायच्या असतील तर यावेळी (MLA Sanjay Bansode) संजय बनसोडे यांनाच निवडून द्यावे लागेल, असेही त्यांनी सांगितले. शहरातील सर्व महा पुरुषाच्या पुतळ्यांना वंदन करून झालेल्या जाहीर सभेत हजारो महिलांनी व नागरिकांनी उपस्थिती लावली होती.