भामरागड (Bhamragad River flood) : तालुक्यातील पर्लकोटा(Pearlkota River flood) नदीला पूर आल्याने भामरागड ते आल्लापल्ली मार्ग पूर्णपणे बंद झालेला आहे. पुराचे पाणी भामरागड गावात शिरल्याने अनेक दुकाने, घरे जलमय झाले आहे. त्यामुळे येतील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत असून आपापल्या दुकानातील समान व घरातील सामान सुरक्षित ठिकाणी हलविण्या करीता तारेवरची कसरत करावी लागत असून, प्रशासकीय यंत्रणा महसूल विभागाचे अधिकारी, (Bhamragarh police) पोलीस विभागाचे अधिकारी , व कर्मचारी येतील जनतेला सुरक्षित ठिकाणी जाण्याकरिता मदत करीत आहेत.