खमारी (Bhandara):- भंडारा तालुक्यातील शिंगोरी फाट्याजवळील महामार्गावर दि.११ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १ वाजता दरम्यान मॅग्निज भरुन जाणार्या ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने अनियंत्रित ट्रक(Truck) महामार्गाच्या कडेला उलटला. त्यात चालकाचा जागीच मृत्यू (Death) झाला. अनिल शिवलाल वरकडे (२७) रा.खैरी खुर्द (म.प्र.), असे मृतकाचे नाव आहे.
ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने अनियंत्रित ट्रक महामार्गाच्या कडेला उलटला
मध्यप्रदेशातील खैरी खुर्द येथील मृतक अनिल वरकडे हा टक क्र.एमएच ४० सीटी ५२५५ या ट्रकवर चालक म्हणून कामाला होता. दि.१० फेब्रुवारी रोजी त्याने तुमसर तालुक्यातील चिखला माईन्स येथून मॅग्निज भरुन राजगडकडे जाण्यास निघाला. शिंगोरी गावाजवळ त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित ट्रक रस्त्याच्या बाजूला उलटला. त्यात चालक अनिल वरकडे याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कारधा ठाण्यातील पोना विकास जाधव, पोशि अमोल वाघ, अमित काळे, यांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व प्रेत शवविच्छेदनाकरीता (Autopsy)पाठविण्यात आले. मृतक याचे पश्चात आठ महिन्याची गर्भवती पत्नी, दोन मुली, असा परिवार असून त्याच्या अपघाती मृत्यूने(death) हळहळ व्यक्त केला जात आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार गणेश पिसाड यांचे मार्गदर्शनात कारधा पोलीस करीत आहेत.