भंडारा (Bhandara Accident) : मृतदेह घेऊन कोलकाताकडे जाणार्या (Ambulance) रुग्णवाहिकेला भंडारा येथे जुना नागपूर नाक्याजवळ (Bhandara Accident) अपघात झाला. त्यात दोघे जण जखमी झाले. एका ट्रकने रुग्णवाहिकेला धडक दिली. सदर अपघात दि. २३ मे रोजी सायंकाळी ५ वाजता घडला. जखमींना जवळच्याच एका (Bhandara Hospital) खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृतदेह घेऊन जात होती कोलकात्याकडे
मृतदेह घेऊन जाणारी (Ambulance) रुग्णवाहिका वाहन क्र.एमएच १९ जे ३७७९ ही कोलकाताच्या दिशेने जात असताना भंडाराजवळ नागपूरकडे जाणार्या ट्रकने धडक दिली. त्यात चालकासह अन्य एकजण जखमी झाला. आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन रुग्णवाहिकेतील जखमींना बाहेर काढून जवळच्याच एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर ट्रक घटनास्थळावरुन पसार झाला. अपघाताची माहिती (Bhandara Police) भंडारा पोलीसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. उशिरापर्यंत भंडारा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.