लाखांदूर तालुक्यातील सोनी येथील घटना
मासळ/भंडारा (Bhandara Accident) : पहिल्या मजल्यावर असलेली स्लॅबची भिंत पाडण्याचे काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळून मजूराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि.२५ जुलै २०२४ रोजी ११.३० वाजतादरम्यान (Bhandara Accident) लाखांदूर तालुक्यातील सोनी येथे घडली. प्रफुल्ल प्यारेलाल रामटेके (२५) रा. विर्शी (टोली) ता. देसाईगंज, असे मृतक मजुराचे नाव आहे. सोनी येथील प्रियंका बावणे यांच्या घर मालकीच्या स्लॅबवरच्या खोलीचे बांधकाम काही वर्षांपूर्वी करण्यात आले होते. ते बांधकाम कच्चा अवस्थेत असल्यामुळे बांधकाम कोसळण्याची शक्यता होती. त्यांनी मजुरांद्वारे ड्रिल मशीनने बांधकाम पाडण्याचे काम गुरुवारी सुरू करण्यात आले होते.
दरम्यान बांधकाम कच्च्या असल्यामुळे ड्रिलमशिनसह स्लॅबची भिंत मजुरावर कोसळली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती (Bhandara Police) पोलीस विभागाला देण्यात आली. माहिती मिळताच लाखांदूर ठाण्यातील पो.हवा. गोपाल कोसरे, पो.ना. संदीप बावनकुळे, पो.कॉं. राहुल कोटांगले यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व प्रेत शवविच्छेदनासाठी लाखांदूर येथे पाठविण्यात आले. या प्रकरणी (Bhandara Police) पोलीसांनी मर्ग दाखल केला असून घटनेचा पुढील तपास लाखांदूर पोलीस करीत आहेत.