अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत
भंडारा (Bhandara Accident) : शहरापासून जवळच असलेल्या बेला येथे महामार्गावर दि. ५ ऑगस्ट रोजी दुपारी दोन ट्रक आमोरासामोर एकमेकांवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात एका ट्रकची कॅबीन चकनाचूर झाली. कॅबीनमध्ये ट्रकचालक फसल्याने गंभीर जखमी झाली. (Bhandara Accident) जखमी ट्रकचालकाला बाहेर काढून उपचारार्थ रुग्णालयात (Bhandara Hospital) दाखल करण्यात आले. यावेळी काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
नागपूरकडून येणारा ट्रक व भंडाराकडून जाणारा ट्रक, दोन ट्रक एकमेकांवर आदळले. अपघात एवढा भीषण (Bhandara Accident) होता की, भंडार्याकडून जाणार्या ट्रकची कॅबीन चकनाचूर होऊन ट्रकचालक फसलेला होता. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मोठ्या प्रयत्नाने ट्रकचालकाला बाहेर काढून (Bhandara Hospital) रुग्णालयात पाठविण्यात आले. माहिती मिळताच भंडारा पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. (Bhandara Police) पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास पोहवा मिलींद जनबंधू करीत आहेत. सदर अपघातात सुनील यादव (५३), असे जखमी झालेल्या ट्रकचालकाचे नाव असल्याचे सांगितले जाते.