प्राचार्याला पालकांनी बदडले; आरोपी पोलिसांच्या स्वाधीन
भंडारा येथील शासकीय नर्सिंग कॉलेज येथील संतापजनक प्रकार
भंडारा (Bhandara Crime) : एकीकडे शासनाकडून लाडकी बहीण योजना राबवून महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. तर दुसरीकडे मात्र लाडक्या बहिणींना सुरक्षित वातावरण देण्यास शासन प्रशासन असमर्थ ‘रल्याचे चित्र आहे. भंडारा येथील शासकीय नर्सिंग कॉलेज येथे धक्कादायक व संतापजनक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. परीक्षेत गुण वाढवून देण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या संतापजनक प्र्रकारामुळे संतप्त पालकांनी प्राचार्याला चांगलेच बदडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अधिनस्त असलेल्या भंडारा येथील शासकीय नर्सिंग ए.एन.एम., जी.एन.एम. येथे २०० विद्यार्थिनी नर्सिंगचे प्रशिक्षण घेत आहेत. या कॉलेजचे प्राचार्य किरण मुरकुट हे वर्षभरापूर्वी रुजू झाले. मागील काही महिन्यांपासून ए.एन.एमच्या प्रथम वर्षाला असलेल्या विद्यार्थिनींना प्राचार्याकडून अपमानास्पद वागणूक मिळत होती. (Bhandara Crime) प्राचार्य विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन करीत असल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले. प्राचार्य हा पीडित विद्यार्थिंनींना व्हाट्स अॅपवर मॅसेज पा’वित होता. विद्यार्थिंनींना वारंवार शरीर सुखाची मागणी करण्यात येत होती. ए.एन.एमच्या प्रथम वर्षात ५ विद्यार्थिनी मागीलवर्षी परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागली. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींची परीक्षा ५ व ६ नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आली.
दि.८ नोव्हेंबर रोजी प्राचार्य मुरकुट यांनी रात्री दोन विद्यार्थिनींना व्हाट्स अॅपवर परीक्षेबाबत विचारणा केली. तेव्हा प्राचार्याने ‘मी तुम्हाला पास होण्यासा’ी मदत करू शकतो’ असे सांगितले. पा’विलेला मॅसेज पीडित विद्यार्थिनींनी आपल्या पालकांना सांगितला. हा संतापजनक प्रकार कळताच प्राचार्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली.
दि.२६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता दरम्यान पीडित विद्यार्थिनी, संतप्त पालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्राचार्याच्या कक्षात धडकून विचारणा केली असता प्राचार्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त पालकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्राचार्याला बेदम चोप दिला. विद्यार्थिनींनी प्राचार्याकडून वारंवार अशाप्रकारची लज्जास्पद वागणूक दिली असल्याची भावना व्यक्त केल्या.
ज्या विद्यार्थिनी नापास झालेल्या असताना सुध्दा विद्यार्थिनींना सुटी न देता महाविद्यालयातच निवासी ठेवत होते. विद्यार्थिनींना बळजबरीने महाविद्यालयाच्या होस्टलमध्ये भाग पाडत होता. यावेळी (Bhandara Crime) जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपचंद सोयाम, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल टेंभूर्णे यांनी शासकीय नर्सिंग कॉलेज येथे पोहोचले. त्यांच्या समक्ष पीडित विद्यार्थिनींनी घडलेल्या घटनेची माहिती दिली. संतप्त पालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी वैद्यकीय अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले.
परिस्थिती चिघडण्याची चिन्हे दिसताच पोलिसांना घटनास्थळी पाचारण करून आरोपी प्राचार्य किरण मुरकूट याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते माजी सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे, बालू ‘वकर, अजय मेश्राम, युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष पवन वंजारी, सतीश सार्वे, अजित बन्सोड, राधेय भोंगाडे, आकाश ‘वकर, रुपेश मारवाडे, उमेश मोहतुरे, पन्ना सार्वे, विनीत देशपांडे, मयुर सूर्यवंशी, जयंत बोटकुले, अमोल लांजेवार, मनोज लुटे यांचेसह अनेक कार्यकर्त्यांनी तसेच संतप्त पालक व विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या प्रशासनाला धारेवर धरले. प्राचार्याच्या कक्षाला सीलठोकण्यात आले.
विद्यार्थिनींनीवर मानसिक दबाव
एम्समध्ये कार्यरत असताना बोगस प्रमाणपत्र सादर केल्याच्या कारणावरून किरण मुरकुट यांना काही वर्षापूर्वी बडतर्फ करण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. भंडारा येथे रुजू झाल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात विद्यार्थिनींनीवर मोठ्या प्रमाणात मानसिक दबाव आणण्याचा प्रकार सुरू असल्याचे विद्यार्थिनींकडून सांगितले गेले. वसतिगृहात महिला वार्ड नसल्याची तक्रार करण्यात आली होती. सदर प्रकरणाची चौकशी शासनाच्या आरोग्य मंत्रालयाने तसेच गृहमंत्रालयाच्या वरिष्ठ महिला अधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी कमिटी स्थापन करून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करावी. सदर प्रकरण हे शिक्षण क्षेत्रात गालबोट लावणारे आहे. यामुळे लैगिंक अत्याचार प्रकरणामध्ये मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप केला जात आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे व सुरक्षारक्षक नाहीत
भंडार्यातील शासकीय नर्सिंग महाविद्यालयातील सदर प्रकरण हे शिक्षण क्षेत्रावर गालबोट लावणारे आहे. या प्रशिक्षण केंद्रात व परिसरात कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे नसून सुरक्षारक्षक देखील नाहीत. विशेष म्हणजे महिला परिचर्या महाविद्यालय असताना पुरुष वार्डनची नियुक्ती याठीकाणी करण्यात आली आहे. ही गंभीर बाब निदर्शनास आली आहे. विद्यार्थिनींचे वसतिगृह विद्यालयापासून बर्याच अंतरावर असल्यामुळे विद्यार्थिनींनी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी प्राचार्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडला जाईल असा इशारा यावेळी संतप्त पालकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.