भंडारा (Bhandara Crime) : साकोली लगतच्या सेंदुरवाफा येथे चक्क विद्युत कंत्राटदाराच्या घरी चोरीचा विद्युत (Bhandara Crime) तार आढळून आल्याचा धक्कदायक प्रकार दि.१४ जून रोजी उघडकीस आला. (Bhandara Police पोलीसांनी १८ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जन्प्त करुन याप्रकरणी ५ आरोपींना अटक केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
पो.स्टे.अड्याळ, लाखांदूर, साकोली, सिहोरा हद्दीतून शेतशिवारातून विद्युत पुरवठा खंडीत करुन अॅल्युमिनियम तार चोरी केला होता. या (Bhandara Crime) घटनेचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर उभे होते. त्यादरम्यान स्थागुशा ला मिळालेल्या माहितीवरुन सेंदुरवाफा येथे वीज कंत्राटदार सचिन कटकवार याचे घरी चोरीचा विद्युत तार ठेवण्यात आला आहे. माहिती मिळताच (Bhandara Police) पोलीसांनी छापा टाकून धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता अन्य आरोपींच्या मदतीने अॅल्युमिनियम तार चोरी केल्याची कबुली दिली.
५ आरोपी अटकेत, १८ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त
पोलीसांनी सचिन कटकवार रा.सेंदुरवाफा निखील मडावी रा.सानगडी, परवेज मस्जिद अगवान रा.आमगाव/बु. तुषार लांजेवार व गोलू उके दोन्ही रा.पळसगाव ता.साकोली यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता चोरी केल्याची कबुली दिली. (Bhandara Police) पोलीसांनी १८ लाख ३६ हजार ०५० रुपयांचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली दोन कार जप्त करण्यात आले. सर्व आरोपींना पुढील कारवाईकरीता कारधा पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले. (Crime branch) सदर कारवाई पो.नि.नितीन चिंचोळकर यांचे मार्गदर्शनात पोउपनि तुरकुंडे पोहवा नितीन महाजन, राजेश पंचबुद्धे, संदीप मते, आशिष श्रावणकर, पंकज भित्रे, मंगेश माळोदे यांनी केली आहे.