जिल्ह्यात शासकीय धान खरेदी केंद्र सुरूच नाही
भंडारा (Bhandara) : जिल्ह्यात रब्बी हंगामातील धान काढणीला सुरुवात झाली आहे. शेकडो हेक्टरवर ( hundreds of hectares ) उन्हाळी धानाची लागवड करण्यात आली आहे. मात्र पिकविलेले धान विकायचे कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मागील खरीप हंगामातील धानाची शासकीय आधारभूत केंद्रावरून उचल न झाल्याने खरेदी केंद्रातील गोदाम भरून आहेत. अजूनपर्यंत ऑनलाइन नोंदणीसुद्धा सुरू करण्यात आली नाही. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या (District Marketing Federation) वतीने जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी केली जाते. मात्र अजूनपर्यंत कुठलीच प्रक्रिया सुरू न झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतातून काढलेले धान वाळवायचे कसे व ते विकायचे कुठे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. चार ते पाच महिने शेतकरी दिवसरात्र मेहनत करून पिकाचे उत्पादन घेतो. परंतु त्यांच्या पिकाला विकण्यासा ठी तारेवरची कसरत करावी लागते. रब्बी हंगामातील धान विक्री करून शेतकरी पुन्हा खरीप आहे. हंगामाच्या तयारीला लागतो. परंतु, अजूनपर्यंत शासकीय धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. जर शासकीय खरेदी केंद्र सुरू झाले नाही, तर शेतकऱ्यांना आपला माल खुल्या बाजारात कवडीमोल भावाने विकावा लागेल. शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी कोणताही लोकप्रतिनिधी समोर येताना दिसत नाही. लवकरात लवकर रब्बी हंगामातील धान खरेदी केंद्र सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात
खरीपातील धान गोडावूनमध्ये पडून
पणन विभागाने ( Marketing Department) धान खरेदी केंद्राची संख्या वाढविली असली तरी प्रत्यक्षात मात्र एकही उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरु झालेले नाही. खरीप हंगामात बहुतांश शेतकऱ्यांनी आपले धान आधारभूत धान खरेदी केंद्रावर विकले. अजूनही गोडाऊनमधील धान्याची उचल करण्यात न आल्याने रब्बी हंगामातील धान साठवायचे कुठे, असा प्रश्न खरेदी केंद्र चालकांसमोर उभा ठाकला आहे. अजूनही धान खरेदी केंद्र सुरु न झाल्याने नाईलाजाने शेतकऱ्यांना आपला धान कवडीमोल भावाने व्यापाऱ्यांना विकावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. तसेच पणन विभागाने खरीपातील धानाची तत्काळ उचल करुन रब्बी हंगामातील धान खरेदी केंद्र तत्काळ सुरु करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.