तिघांचा मृत्यू तर एक जखमी, पाथरी गावात शोककळा
गर्रा/बघेडा (Bhandara Fatal accident) : भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी आंतरराज्यीय मार्गावर दि.२१ एप्रिल रोजी रात्री ११ वाजतादरम्यान भीषण अपघात घडला. बोलेरो वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात तीन लोकांचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाली. सदर अपघात तुमसर तालुक्यातील पाथरी गावाजवळ घडला. (Bhandara Fatal accident) जखमी महिलेवर जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचारार्थ दाखल असून मृत्यूशी झुंज देत आहे.
मृतांमध्ये पती-पत्नीसह शेजारी ५ वर्षीय चिमुकलीचा समावेश
मृतांमध्ये कैलाश मरकाम (४५), पारबता मरकाम (४०) तर शेजारी रुपाली दुर्गाप्रसाद कंगाली (०५), अशी मृतकांची नावे आहेत. तर सुषमा दुर्गाप्रसाद कंगाली (३०), असे जखमीचे नाव आहे. या (Bhandara Fatal accident) संदर्भात गोबरवाही पोलिसांनी बोलेरो वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तुमसर तालुक्यातील चिखला (माईन) येथील वैâलाश मरकाम, त्याची पत्नी पारबता मरकाम, शेजारी राहणार्या सुषमा दुर्गाप्रसाद कंगाली व पाच वर्षीय मुलगी रुपाली कंगाली, असे चौघे दुचाकीने मध्यप्रदेशातील बोनकट्टा येथे लग्नसोहळ्यासाठी गेले होते. लग्नसमारंभ आटोपून रात्री स्वगावी परतत असतांना पाथरी गावाजवळील रामनगर जवळ ही दुर्दैवी घटना घडली.
अपघाताची माहिती होताच गोबरवाही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला उपचाराकरीता रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. (Bhandara Fatal accident) जखमीची प्रकृती चिंताजनक असून मृत्यूशी झुंज देत आहे. पोलिसांनी बोलेरो वाहनचालकाला ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे चिखला गावात शोककळा पसरली आहे. पुढील तपास गोबरवाही पोलीस करीत आहेत.