सुदैवाने जिवित हाणी टळली
आसगांव (Bhandara flood) : भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील दोन ते तीन दिवसापासून संततधार पावसामुळे सर्वत्र हाहाकार माजला होता. त्यात आसगांव आणि परिसरातील गावातील लावडी, मोहरी, बोरगांव, पौना, मांगली, वलनी, शिवनाळा, खैरी दिवाण, कोढा कोसरा, शेंद्री, सोमनाळा, पालोरा अशा अनेक ठिकाणी पवनी तालुक्यातील अनेक रस्ते आणि महामार्ग बंद झाले होते.
आसगांव आणि परिसरातील पवनी-लाखांदूर रोडवर असलेल्या आसगांव चौ.येथिल सेंद्री फाट्याजवळ असलेल्या मुख्य मार्गावर पुलावर ४ ते ५ फुट पाणी वर चढला असून संपूर्ण परिसर जलमय झाला होता. आसगांव चौ. ला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले होते. आजूबाजूच्या परिसरात ९०० घरात पाणी शिरल्याने पाणीच पाणी अशी स्थिती निर्माण झाली होती. आतापर्यंत या दोन ते तीन दिवसात आसगांव येथिल राहत असलेल्या नागरिकाची दोन ते तीन दिवसात २५ घरे पावसाच्या पाण्यामुळे कोसळली असून कोणतीही जिवित हाणी झालेली नसून मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार आसगांव चौ.येथिल घर पडलेल्या नागरिकाचे नावे नारायण सावरबांधे, बळीराम मेश्राम, कांचन हत्तीमारे, राजेश मेश्राम, मोहन मेश्राम, पुरुषोत्तम गिर्हेपुंजे, केशव पंधरे, जीवन पंधरे, चंद्रा तुलाराम ब्राह्मणकर, सुमन मोरेश्वर उपरीकर, आनंदराव साव कोरे, विमल तुलाराम जांगळे, छाया हरिचंद्र नान्हे आणि इतर अनेक नागरिकाचे राहण्याची घर कोसळत असून कित्येकाचे संसार उद्धवस्त झाले आहे. राहते घर पडल्यामुळे अनेक नागरिकाचे संसार उघड्यावर आले असून कोणी घर देता का घर अशी येथिल नागरिकाची अवस्था झाली आहे.
घर पडल्याने अनेकांच्या घरातील सर्व साहित्य पावसाच्या पाण्यात वाहत गेलेले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यांच्या मदतीला तालुका प्रशासन आणि स्थानिक ग्रामपंचायत कार्यालय आसगांव चौ.येथिल सरपंच निंशिता कोरे, उपसरपंच महेश फुंडे, ग्रामविस्तार अधिकारी पी.आर.हटवार, ग्रा.पं.सदस्य महेश गजभिये, शितल रामटेके, अनुसया मेंढे, कृष्ण कोरे, मुकुल सावरबांधे, हिरा ईलमकर, अर्चना मेंढे, अनिता मांडवकर, वाल्मीक माथुरकर, सुनील भाजीपाले, रेखा हत्तीमारे, मंगला मेंढे, राजाराम पागोटे, शैलेश मेंढे, आनंदराव पेलणे, प्रशांत मेश्राम ,प्रतिभा काळबांडे, राजपूत गजभिये आणि ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी वर्ग आसगांव चौ. येथील नागरिकांच्या विविध प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. संपूर्ण गावात पाण्याने विळखा घातला होता.
प्रत्येक घरामधे ३ ते ४ फूट पाणी शिरल्याने घरातील खाण्याच्या वस्तू, अन्न धान्य, कपडे, जनावरांचा चारा, शेतीला आवश्यक बी-बियाणे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने नाजूक परिस्थिती निर्माण झालेल्या व्यक्तींना जेवणाची व्यवस्था, भाजीपाल्याची व अन्नधान्य पुरविणे याचबरोबर आवश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात आला आहे.