पवनी/भंडारा (Bhandara):- जिल्ह्यात तीन-चार दिवसांपासून मुसळधार व संततधार पावसाने (Rain)हाहाकार केला. पवनी व लाखांदूर तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. पवनी तालुक्यातील आसगाव व लाखांदूर तालुक्यातील ओपारा गावाला पुराने वेढा घातला आहे.
नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले
पवनी-लाखांदूर महामार्ग (Highway)बंद असून रस्त्यावर अडीच फूट पाणी आहे. महामार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. दि.२२ जुलै रोजी रात्री पवनी मत्स्य उत्पादक(fish producers) सहकारी संस्थेच्या पथकाने घरात अडकलेल्या नागरिकांना बोटीद्वारे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. घटनास्थळी तहसीलदार, ठाणेदार, गटविकास अधिकारी, पोलीस पथक व जिल्हा शोध व बचाव पथक तळ ठोकून आहेत. सायंकाळपर्यंत पावसाची संततधार सुरूच होती.