जिल्हा रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर
भंडारा (Bhandara Hospital News) : जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केलेल्या अश्विनी महेश मेश्राम (२९) रा.लोहारा पाथरी, या महिलेचा प्रसूती पूर्वीच मृत्यू झाल्यावर शस्त्रक्रिया करून महिलेच्या पोटातून बाळ काढण्यात आले. मात्र बाळ जिवंत की मृत्यू पावला आहे, हे पालकांना न सांगताच (Death of woman) महिलेचा शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन केल्यावर स्मशानभूमीत जेव्हा अंत्यसंस्कार करण्यासाठी आणले.
मृत आईसोबत (Death of woman) बांधलेला बाळाचा शव वेगळा करण्यासाठी गेले असता आईसोबत बाळ नसल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान स्मशानभूमीत गावकर्यांनी अग्निसंस्कार थांबविले असून डॉक्टरांनी प्रथम बाळ दाखवावे तरच सर्व सोपस्कार आटोपू, अशी भूमिका घेतल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली. यात पुन्हा एकदा (Bhandara Hospital) जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांचा अक्षम्य हलगर्जीपणा उघडकीस आला आहे.