तुमसर(Bhandara):- तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्रात शरद पवार (Sharad Pawar)यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या वतीने प्रामाणिकपणे काम करणाऱ्या किरण अतकरी यांनी जिल्ह्यात पक्ष उभा करुन पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले असले तरी येथे पक्षनिष्ठ नेत्यांना डावलून आयत्या बिळात नागोबाला उमेदवारी दिली असल्याने मतदारांत महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. परीणमी याचा थेट परिणाम शरद पवार गटाच्या उमेदवाराला बसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
महा विकास आघाडी पक्षात अंतर्गत संघर्षाची ठिणगीची स्थिती निर्माण झाली
शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात पक्षाचे विचार पोहोचवण्याचे काम किरण अतकरी यांनी प्रामाणिकपणे केले. मात्र, पक्षाने आमदार पदासाठी उभा असलेल्या त्या पक्ष सोड्या वर विश्वास दाखवल्याने किरण यांचे समर्थक संतप्त झाले आहेत आणि त्यांनी या निर्णयावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. कीरणच्या मेहनतीवर दुसऱ्याची मजा होत असल्याची चर्चा मतदारांत ऱगली आहे. या घडामोडींमुळे तुमसर-मोहाडी मतदारसंघात महा विकास आघाडी पक्षात अंतर्गत संघर्षाची ठिणगीची स्थिती निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेला व मेहनतीला योग्य तो सन्मान मिळत नसल्याने येथे महाविकास समर्थक नाराज झाले आहेत. सदर नाराजीचा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बसण्याची दाट शक्यता आहे.