– खरेदी केंद्राअभावी उन्हाळी धानविक्रीचे संकट
– प्रत्यक्ष धान खरेदी केव्हा? : शेतकऱ्यांचा प्रश्न
भंडारा (Bhandara ) लाखनी खरीप हंगाम २०२३ मध्ये समाधानकारक उत्पादन हाती आले नाही म्हणून सिंचनाच्या सोयी असणाऱ्या शेतकऱ्यांनी (Farmers) रब्बी हंगाम २०२३ मध्ये धान पिकाची लागवड केली. सध्याधानपिक मळणीच्या हंगाम सुरू असून खरीप हंगाम (Kharif season) २०२४ ला सुरुवात होणार आहे. मात्र रब्बी हंगामामध्ये (Rabbi Hungama) उत्पादित धान पीक खरेदी केंद्र सुरू न झाल्याने तसेच पडून आहे. त्यामुळे धानाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांपुढे ग्रहण प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. तेव्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांची समस्या जाणून घेण्याच्या कार्यवाहीला प्राधान्य देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. खरीप हंगामात खरेदी केंद्रामार्फत (center) खरेदी केलेले धान भरडाईसाठी उचलले गेले नसल्यामुळे ते अजूनही गोदामात भरून आहे. एकीकडे शेतकऱ्याला निसर्ग साथ देत नाही.
त्यामुळे शेतकऱ्याला खाजगी व्यापाऱ्याला रब्बी हंगामात उत्पादित धान्य विकण्याची वेळ आली आहे. ओल्या आणि कोरड्या दुष्काळातून सावरत नाही तर खोडकिडा, तुडतुडा यासारख्या रोगांचा शेतकऱ्यांना सामना करत असतानाच गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. सध्या कापणीला आलेले धान अवकाळी पावसामुळे शेतात पडून आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे धानाच्या लोंब्या पाण्यात भिजल्याने ते अंकुरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला मळणी झालेले धान मिळेल त्या भावात खाजगी व्यापाऱ्याला (private trader) विकल्याशिवायपर्याय उरत नाही.
-नेतेमंडळी व्यस्त आहेत. तर शेतकरी हवालदिल झाला आहे.
त्यामुळे रब्बी हंगामात धान विकण्याचा शेतकऱ्यांपुढे मोठा गहन प्रश्न निर्माण झालेला आहे. मागील खरिपाच्या हंगामात शासनाने खरेदी केलेले धान अजूनही गोदामात असल्याने लाखनी तालुक्यातील गोदाम हाऊसफुल झाले आहेत. त्या धानाला भरडण्यासाठी अजूनपर्यंत परवानगी नसल्याने त्या धानाची उचल झाली नाही. त्यामुळे आता रब्बीचे धान ठेवणार कुठे? असा प्रश्न निर्माण झाला असून शासनाने यावर त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली पर्याय नाही. लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha elections) टप्पा सुरू आहे.