Bhandara:- भंडारा तालुक्यातील सिल्ली शेतशिवारात दि.१९ जून रोजी दुपारी अडीच-तीन वाजतादरम्यान दुर्दैवी घटना घडली. धान पर्हे भरण्यास कालव्याच्या पाळीवरुन जात असलेला ट्रॅक्टर (Tractor)कालव्यात कोसळला. त्यात ट्रॅक्टर चालक मालक असलेल्या शेतकर्याचा ट्रॅक्टरखाली दबून दुर्दैवी मृत्यू (Death)झाला. कैलाश देवमन बावनकुळे (३५) रा.सिल्ली, असे मृतकाचे नाव आहे.
काही दिवसापूर्वीच नवीन ट्रॅक्टर खरेदी केला होता
सिल्ली येथील कैलाश बावनकुळे हे शेतकरी (Farm)असून शेतीकामासाठी त्यांनी काही दिवसापूर्वीच नवीन ट्रॅक्टर खरेदी केला होता. सध्या धान पर्हे भरण्याचे काम सुरु असून दि.१९ जून रोजी दुपारी अडीच-तीन वाजतादरम्यान एका शेतातील धान पर्हे भरुन दुसर्या शेतात टेकेपार उपसा सिंचन योजनेच्या कालव्याच्या पाळीने जात असतांना ट्रॅक्टरचालक मालक कैलाश बावनकुळे याचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित ट्रॅक्टर कालव्यात कोसळला. त्यात ट्रॅक्टरचालक मालक याचा ट्रॅक्टरखाली दबून करुन अंत झाला. गावात माहिती होताच कुटूंबियांनी एकच हंबरडा फोडला. गावकर्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. माहिती मिळताच कारधाचे पोउपनि प्रशांत साखरे, पोहवा तोमेश्वर लांबकाने, पोशि जितेंद्र काटगाये, अभिषेक मिश्रा, यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला व प्रेत शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आले. एकुलता एक असलेल्या वैâलाश याच्या अपघाती मृत्यूने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचे मृत्यूपश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, असा परिवार आहे. पुढील तपास ठाणेदार गणेश पिसाळ यांचे मार्गदर्शनात कारधा पोलीस करीत आहेत.