बचत गटाचे पैसे भरूनही थकबाकीदार
सेनगाव/हिंगोली (Bharat Finance) : भारत फायनान्सच्या कार्यालयाला दोन संतप्त महिलांनी कुलूप ठोकल्याचा प्रकार गुरुवार तारीख 11 रोजी सायंकाळी पाच वाजता घडला आहे सदरील महिलांनी कर्मचाऱ्याकडे बचत गटाचे पैसे भरून पावत्या घेऊन त्यांच्या नावे कर्जदार असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे एका कर्मचाऱ्यांनी तर चक्क 61 महिलांचे जवळपास 12 लाख रुपये वसूल करून आपहार केला आहे. दरम्यान तालुक्यात शेकडो महिलांची आर्थिक फसवणूक झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तालुक्यातील गोरेगाव येथील अनिता मधुकर पाटोळे व सागर केशव वैराणे ह्या महिला सेनगाव येथील (Bharat Finance) भारत फायनान्स कार्यालयात गुरुवार तारीख 11 रोजी सकाळपासून आल्या होत्या मागील सहा महिन्यापासून ह्या महिला कार्यालयाला चकरा मारत आहेत मात्र त्यांच्या व्यथेची तीळमात्र दखल घेतली नाही रोज मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या महिलांनी भारत फायनान्स कंपनीच्या बचत गटाचे हप्ते वारी कर्ज परतावा केला या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना पैसे भरल्याची पावती दिली मात्र प्रत्यक्षात त्यांच्या कर्ज खात्यावर पैसे भरले नाही गोरेगाव येथील आणखी काही महिलांनी या कंपनीच्या कर्मचाऱ्याकडे बचत गटाचे पैसे भरले पावत्या घेतल्या परंतु पैसे कंपनीकडे न भरता संबंधित कर्मचाऱ्यांनी अपहार केल्यामुळे या महिलांचे सिविल खराब झाले व इतरत्र स्मॉल फायनान्स कंपनीकडून त्यांना लोन मिळणे बंद झाले.
या दोन्ही महिलांनी कर्ज भरूनही कर्जदार असल्यामुळे त्यांना त्यांच्या पतीकडून अतोनात त्रास सुरू झाला अशी प्रतिक्रिया दिली या दोन्ही महिलांनी दागिने विकले ,सावकारी कर्ज घेऊन (Bharat Finance) भारत फायनान्स कंपनीचे कर्ज भरले परंतु कर्मचाऱ्यांनी पैशाचा अपहर केला मागील सहा महिन्यापासून वारंवार या कार्यालयाकडे चकरा मारून त्यांना न्याय मिळाला नाही संतप्त महिलांनी या कार्यालयाला कुलूप ठोकले व सदरील कर्मचाऱ्याकडे कुलपाची चावी दिली जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत कार्यालाईन कामकाज बंद ठेवा अशी तंबी दिली. दरम्यान त्रस्त महिलांची आर्थिक फसवणूक झाल्याची माहिती मिळताच नगरसेवक ओमप्रकाश देशमुख घटनास्थळी पोहोचले व कर्मचाऱ्यांना चांगले धारेवर धरले तात्काळ फसवणूक झालेल्या महिलांचा प्रश्न मार्गी लावा असा इशारा दिला.
एकाने केला बारा लाखाचा अपहार
भारत फायनान्स कंपनीला (Bharat Finance) काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने 61 महिलांचे अकरा लाख 86 हजार 922 रुपये वसूल करून अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याबाबत सचिन कदम भारत फायनान्स कंपनीचे शाखा मॅनेजर यांनी (Sengaon Police) सेनगाव पोलीस ठाण्यात रितसर या ९ जुन रोजी तक्रार दाखल केली आहे दरम्यान तालुक्यातील शेकडो महिलांची आर्थिक फसवणूक या कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांकडून झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे