बुलडाणा(Buldhana):- भाविक भक्तांची तिर्थस्थानाला भेटी देण्याची आंतरिक इच्छा असुनही तिर्थ करता येत नाही, ही गरज लक्षात घेवून स्पेशल रेल्वे यात्रेचा संकल्प सोडण्यात आला आणि या रेल्वे यात्रेला अल्पावधीतच प्रचंड उस्फुर्त प्रतिसाद मिळाला, सर्व यात्रेकरूंची मनोकामना पुर्ण होईल व ही यात्रा अभुतपुर्व होईल असे गौरवोद्गार सदभावना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी काढले.
सद्भावना सेवा समितीने सार्थ केला जनतेचा विश्वास- राधेश्याम चांडक
१० नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबरच्या दरम्यान श्री क्षेत्र जगन्नाथपुरी(Jagannathpuri), गंगासागर, काशी वाराणशी, अयोध्या(Ayodhya), मथुरा, वृंदावन (Vrindavan) व परत अकोला अशी राहील. गंगासागर, अयोध्या व वृंदावनला विश्राम राहील. विदर्भ मिरा सुश्री अलकाश्रीजीच्या सानिध्यात यात्रा होत असल्यामुळे सर्व यात्रेकरु उत्साहात आहेत. दि. १० नोव्हेंबर रविवारी सकाळी ९.०० वाजता अकोला रेल्वे स्टेशनवरुन(Akola Railway Station) जगन्नाथपुरीला प्रस्थान होईल, ११ नोव्हेंबर सकाळी ९.०० वाजता जगन्नाथपुरी रेल्वे स्टेशनवर आगमन, दर्शन व भ्रमण करून रात्री ८.०० वाजता कोलकत्ता येथे गंगासागरसाठी प्रस्थान, १२ तारखेला कोलकत्ता आगमन बस द्वारा गंगासागरसाठी रवाना, दर्शन घेवून रात्री विश्राम, १३ नोव्हेंबरला कोलकत्ता परत, रात्री ९.०० वाजता वाराणसीसाठी प्रस्थान, १४ नोव्हेंबरला सकाळी ११.०० वाजता वारानसी आगमन, काशि विश्वनाथ दर्शन, गंगा आरती दर्शन करून रात्री १०.०० वाजता अयोध्या प्रस्थान, १५ नोव्हेंबरला सकाळी ६.०० वाजता अयोध्या येथे आगमन, शरयु स्नान, अयोध्या दर्शन भ्रमण व रात्री विश्राम, १६ नोव्हेंबरला विदर्भ मिरा संत सुश्री अलकाश्रीजी यांचे अमृतवाणीतुन सुंदरकांडचे पठण, रात्री विश्राम, १७ नोव्हेंबरला सकाळी मथुरा आगमन, वृंदावन करीता प्रस्थान व विश्राम, सोमवार दि. १८ नोव्हेंबर रात्री प्रस्थान, १९ नोव्हेंबर दुपारी ४.०० वाजता अकोला येथे आगमन व समापन.
नागपुरचे मनमोहन मर्दा यांनी संपुर्ण चोख व्यवस्था केली व संपुर्ण यात्रेची माहिती दिली
या दिव्यसंकल्प रेल्वे यात्रेसाठी नागपुरचे मनमोहन मर्दा यांनी संपुर्ण चोख व्यवस्था केली व संपुर्ण यात्रेची माहिती दिली. रेल्वेचे बुकींग करण्यासाठी नागपुरचे डॉ. परमेश्वर लड्डा, अमरावतीचे सुशिल सारडा, हरीष मानधना अकोला, घनश्याम बागडी यवतमाळ, संतोष महेंद्र, संदिप केला आर्वी, अशोक राठी दिग्रस, गोपाल राठी शेगांव, संतोष गुडगीला नांदेड, अशोक भाला परळी, गणेश डागा राजनंदगांव, पवनजी चांडक तेल्हारा, अजय भट्टड ब्रम्हपुरी, केदार मानधना बीड, पवन पनपालीया आर्णी, चंपालाल शर्मा बुलडाणा यांनी विशेष परिश्रम घेतले त्यामुळे जवळपास बुकींग पुर्णत्वास येत असुन जनतेकडुन उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. यात्रेचे व्यवस्थापन व्यवस्थीत होण्यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात येईल. सदभावना सेवा समिती बुलडाणा द्वारा आयोजित संकल्प यात्रेला यशस्वी करण्यासाठी स्वतः समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, चंपालाल शर्मा, सुरेश गट्टाणी, उमेश मुंदडा, तिलोकचंद चांडक, प्रकाशचंद्र पाठक, सिध्दार्थ शर्मा, मधुकर गायके, पुरणमल शर्मा व इतर सर्व कार्यकर्ते प्रयत्नशिल आहेत. स्पेशल रेल्वे यात्रा प्रतिवर्षी विभीन्न तिर्थस्थानासाठी काढण्यात येईल व चारही धाम पुर्ण होईल त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी केले. १० नोव्हेंबरला अकोला येथुन प्रारंभ बडनेरा, नागपूर व राजनंदगांव येथुन सर्व यात्रेकरूंना घेवून रेल्वे रवाना होईल.