बुलढाणा (Bharat Vidyalaya Buldhana) : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे मार्फत शिक्षकांसाठी “दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा ” घेण्यात आली होती. ह्या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने आधुनिकतेची कास धरत विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांना सुद्धा एक डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला होता. नुकताच त्या स्पर्धेचा तालुका व जिल्हास्तर निकाल जाहीर झाला आहे. ह्या स्पर्धेमध्ये (Bharat Vidyalaya) भारत विद्यालय, बुलढाणा तील शिक्षकांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.
वर्ग 11,12 (उच्च माध्यमिक) गटातून जिल्हास्तरावर विज्ञान विषय गटातून प्रथम क्रमांक संजय देवल (रोख बक्षीस 10, 000₹ व प्रमाणपत्र) तर द्वितीय क्रमांक (रोख बक्षीस 9000₹ व प्रमाणपत्र) प्रेषित सिद्धभट्टी यांनी प्राप्त केला आहे. गणित विषय गटातून अरुण सौभागे (रोख बक्षीस 10, 000₹ व प्रमाणपत्र) यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. भाषा विषय गटातून विनोद देशमुख यांनी प्रथम क्रमांक ( रोख बक्षीस 10, 000 ₹ व प्रमाणपत्र) तर सामाजिकशास्त्र गटातून रविंद्र वानखडे यांनी द्वितीय क्रमांक (रोख बक्षीस 9000₹ व प्रमाणपत्र) प्राप्त केला आहे.
आठवी ते दहावी गणित विषय गटातून जिल्हा स्तरावर दुसरा क्रमांक (रोख बक्षीस 9000₹ व प्रमाणपत्र) श्री वैभव चाकणकर यांचा आला आहे. वर्ग सहावी ते आठवी विज्ञान विषय या गटामधून अमोल बाळ यांचा तालुका स्तरावर तिसरा क्रमांक (रोख बक्षीस 1500₹ व प्रमाणपत्र) आला आहे. (Bharat Vidyalaya) शिक्षकांच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा डॉ सीमा आगाशे, सचिव अंगद आगाशे तसेच मुख्याध्यापक प्रल्हाद गायकवाड, उपमुख्याध्यापक मोहन घोंगटे, पर्यवेक्षक नवल गवई यांनी अभिनंदन केले आहे. भारत शाळेतील शिक्षक करोना काळात देखील विद्यार्थांना ऑन लाईन शिक्षण देण्यात अग्रेसर होते हे विशेष.