कामगारांचे ज्वलंत प्रश्न प्राधान्याने सोडवा अन्यथा तीव्र आंदोलन
देशोन्नती वृत्तसंकलन
राजुरा (Mazdoor Union strike) : वेकोलीचे कोळसा खाण कामगार व ठेकेदारी कामगार यांच्या ज्वलंत मागण्यांसाठी अखिल भारतीय खदान मजदूर संघाने (Mazdoor Union strike) बल्लारपूर क्षेत्रीय मुख्य महाव्यवस्थापक कार्यालयावर धरणे दिले. भर पावसात शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत हा संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
या (Mazdoor Union strike) आंदोलनाचे नेतृत्व बीकेकेएमएस चे केंद्रीय महामंत्री सुधीर घुरडे, वर्धा व्हॅलीच महामंत्री अनिल निब्रड, उपाध्यक्ष हनुमंतू भंडारी, मंत्री श्रीनिवास कोपूला, क्षेत्रीय कल्याण समिती सदस्य प्रविण मुनगंटीवार, समय्या येलुकापल्ली, पांडुरंग नंदूरकर यांनी केले. यावेळी दि. ३० सप्टेंबर रोजी वेकोलिच्या नागपूर मुख्यालयावर विशाल धरणे आंदोलन होणार असून कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी बोलतांना केंद्रीय महामंत्री सुधीर घुरडे म्हणाले, कोळसा कामगार आणि कोल इंडिया मध्ये काम करणारे ठेकेदारी कामगार या दोघांनाही योग्य व न्याय्य सुखसुविधा मिळणे हा त्यांचा हक्क असून त्यासाठी बीएमएस संघर्ष करीत आहे. ठेकेदारी कामगारांना वार्षिक बोनस मिळावा, ही मागणी आम्ही प्रकर्षाने लावून धरली आहे. यावेळी घुरडे यांनी कोल इंडिया संबंधित (Mazdoor Union strike) सर्व कंपन्यांमध्ये सदस्यता करण्याच्या प्रक्रियेत समानता असावी, अकराव्या वेतन समझोत्यातील मंजूर असलेल्या सर्व तरतुदींची तातडीने अंमलबजावणी करावी.
सर्व कंपन्यांमध्ये सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल निर्माण करून पुरेसा वैद्यकीय पदभरती करून आवश्यक ती औषधी उपलब्ध करून द्यावी, कॅडरशिपमध्ये बदल करून सन्मान जनक पदांची निर्मिती करावी, कळसा उद्योगांमध्ये कार्यरत महिलांच्या सशक्तीकरणासाठी कंपनी पातळीवर समितीचे गठन करावे, (Mazdoor Union strike) प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना भूमी अधिग्रहण नुकसान भरपाई व मोबदला वाढवून द्यावा आणि त्यांना नोकरी देताना होणारा त्रास कमी करावा, वेकोलिचे व ठेकेदारी कामगारांना विमा सुरक्षा द्यावी, आदी मागण्यांची सविस्तर माहिती दिली.