लाभयार्थ्याना वेठीस धरणाऱ्या गटविकास अधिकारी सतीश देशमुख यांना निलंबित करा
वरुड (Bharatiya Janata Party) : वरुड तालुक्यातील घरकुल, सामूहिक सिंचन विहीर व इतर लाभार्थी यांना वेठीस धरून यांचे आर्थिक नुकसान करणारे गटविकास अधिकारी सतीश देशमुख यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करून नुकसानग्रस्त लाभार्थी यांचे पैसे खात्यावर टाकण्यात यावे यासाठी आज (Bharatiya Janata Party) भारतीय जनता पार्टी वरुड च्या वतीने गटविकास अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देशमुख यांचा निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे यांनी मध्यस्थी केल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे दिले आश्वासन
पंचायत समिति कार्यालय (Panchayat Samiti) वरुड येथील गटविकास अधिकारी सतीश देशमुख हे डीएससी सोबत घेऊन रजेवर गेलेले असल्यामुळे तालुक्यातील सामूहिक सिंचन विहीर व घरकुल लाभार्थी यांचे सतीश देशमुख यांच्या हलगर्जीपणामुळे लाभार्थी यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे.
तसेच वरुड तालुक्यातील मोदी आवास योजनेचे एकूण 1374 लाभार्थी ज्यांचे घरकुल मंजुरात देऊन जवळपास सर्वच लाभार्थी यांनी घरकुलचे कामे सुरू केलेले आहेत. अश्या लाभार्थी यांचे शासनाकडून आलेले पैसे सुद्धा डी.एस.सी. नसल्यामुळे आहारीत करता आलेले नाही. घरकुल लाभार्थी यांनी उसनवारी करून घरकुलचे काम सुरू केले. पण गटविकास अधिकारी सतीश देशमुख यांच्यामुळे घरकुल लाभार्थी यांचे पैसे परत गेले. सिंचन विहीरी २३-२४ मध्ये ५६२ मजुर झाल्या परंतु त्यामध्ये चुकिच्या अटी लाऊन शेतकयांना नाहक त्रास देऊन शेतक री लाभार्थी यांचे झीरो मस्टर मारून तसेच वळेवर मस्टरचे पैसे न मिळाल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले.
तसेच एप्रिल २०२४ पासुन सिंचन विहीरीचे ५५ प्रस्ताव पंचायत समिति येथे पडून आहे त्यानां अध्याप पर्यंत मंजुरी नाही व सर्व ग्राम पंचायत ला प्रस्ताव पाठवू नये अशा सुचना सचिवांना दिल्या मुळे प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये विहीरीचे प्रस्ताव पडुन ओह. पंचायत समिती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी विभागाकडून शासनाकडे निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आल्यानंतर तो मंजुर सुध्दा झाला. त्यानुसार आयुक्त कार्यालयाकडून १३ सप्टेंबर २०२४ रोजी ४५ लाख ४९ हजार ३३८, १७ सप्टेंबर २०२४ अनुक्रमे १ लाख ९८ हजार ४०० रुपये व २६ हजार १०४ रुपयांचा निधी पाठविण्यात आल्याचे ३ पत्र पंचायत समिती कार्यालयाला प्राप्त आहेत. त्यानुसार पंचायत समिती सप्टेंबर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी योजना विभागाने पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहीती दिली. परंतु पंचायत समितीला जबाबदार अधिकारीच नसल्यामुळे या पत्राबाबत कुणीही गांभिर्याने घेतले.
खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे
१३ ते १७ सप्टेंबर दरम्यान ४७ लाख ७३ हजार ८४२ रुपये प्राप्त झाल्यानंतर किमान १८ सप्टेंबरपासुन केव्हाही ही प्रक्रिया डीएससी मार्फत होणे गरजेचे होते परंतु गटविकास अधिकारी डीएससी सोबत घेवुन गेल्याने व त्यांनी कुणालाही पदभार न दिल्याने एक पैसाही वरुड तालुक्याच्या वाट्याला आला नाही, जिल्ह्यातील इतर पंचायत समित्यांनी तो निधी आपल्याकडे ऑनलाईन वळवुन घेतला आणि वरुड तालुक्यातील तब्बल ४७ लाख ७३ हजार ८४२ रुपयांचे नुकसान झाले आहे.
गुरांचे गेाठे 2023-२४ मध्ये ४०० पेक्षा जास्त गोठ्यांना मंजुरी देण्यात आली होती परंतु (BDO) एप्रील २०२४ पासून एकाही गोठा मंजुर केला गेल नाही १० प्रस्ताव पं. स. ला पडून आहे सचिवाल प्रस्ताव पाठवू नये अश्या सक्त सूचना दिल्या आहेत. फळबाग योजना 2023-2४ मध्ये संत्रा व मोसंबीच्यl 300 हेक्टर फळबाग योजना शेतकऱ्याच्या मंजूर झाला. एप्रिल 20२४ पासून एकाही शेतक-यांची फळबाग योजना मंजुर केल्या गेली नाही.
करिता वरुड तालुक्यातील घरकुल, सामूहिक सिंचन विहीर व इतर लाभार्थी यांना वेठीस धरून आर्थिक नुकसान करणारे गटविकास अधिकारी सतीश देशमुख यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करून नुकसानग्रस्त लाभार्थी यांचे पैसे सात दिवसाच्या आत खात्यावर टाकण्यात यावे, अन्यथा आहमी तालुक्यातील सर्व लाभार्थी पंचायत समिति कार्यालय समोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा देण्यात आला. यावेळी (Bharatiya Janata Party) भाजपा मोर्शी विधानसभा निवडणूक प्रमुख मनोहर आंडे, जिल्हा उपाध्यक्ष अर्चना मुरूमकर, गोपाल मालपे, इंद्रभूषण सोंडे, प्रवीण उर्फ शेशू मानकर, निळकंठ मुरूमकर, रूपाली सोंडे,योगेश्वर खासबागे, जिल्हा संयोजक सोशल मिडिया प्रीतम अब्रुक, दीपक पवार, विद्या भूबंर, भाग्येश देशमुख, प्रतिभा महल्ले, अश्विनी खोडे, कैलाश निंभोरकर, रामकृष्ण कराळे, सचिन सव्वालाखे, नीलेश वसुले, यश देशमुख यांच्यासह शेकडो लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.