जुने निष्ठावंत भाजपा कार्यकर्ता मेळावा उत्साहात
मानोरा (Bharatiya Janata Party) : भाजपा पक्ष हा आमच्या सर्व जुने कार्यकर्त्याचा आत्मा असुन (Bharatiya Janata Party) पक्षाने दिलेली जबाबदारी आजपर्यंत पार पाडत असुन पुढेही पार पाडू, तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत जेष्ठ कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांचा विचाराचा सन्मान करत उमेदवारीचा पक्ष श्रेष्ठींनी निर्णय घ्यावा, असे मत लोकसभा समन्वयक राजू पाटील राजे (Raju Patil Raje) यांनी दि. २३ सप्टेंबर रोजी खुपसे सेलिब्रेशन हॉल येथे पार पडलेल्या भाजपा कार्यकर्ता बैठकीत व्यक्त केले.
आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष महादेवराव ठाकरे होते. मंचकावर महंत जितेंद्र महाराज, भक्तराज राठोड महाराज, कारंजा नगर परिषद माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा, विजय काळे पाटील, डॉ सुहास देशमुख, अभिमान महाराज, मिलिंद देशमुख, निरंजन पाटील, गोदावरी जाधव, अन्नपूर्णा पांडे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना राजे म्हणाले की उमेदवारी देतांना पक्षाने स्थानिक जुने भाजपा कार्यकर्ते यांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. पक्षाने आयात उमेदवार लादू नये. बैठकीत असलेल्या पैकी पक्षाने उमेदवार निवड करून उमेदवार द्यावा भाजपा सोबत एकसंघ राहून काम करणार असे म्हणाले.
कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन उमेदवार जाहीर करावा
यावेळी (Bharatiya Janata Party) भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना गोलेच्छा म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घराणेशाहीला विरोध केला असून आपण सुद्धा गडकरी यांच्या मतावर ठाम असून घराणे शाही उमेदवारीला आपला विरोध राहील येथे उपस्थित पैकी कोणाला ही पक्षाने उमेदवारी द्यावी आपण सोबत राहून काम करू असे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात महादेवराव ठाकरे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचे वरीष्ठ नेते पुढाऱ्यांनी मतदार संघातील मूळ जुने (Bharatiya Janata Party) भाजपा कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडला जावा असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सुहास देशमुख यांनी केले. संचालन मंदार जोशी यांनी केले तर आभार सुदाम तायडे यांनी मानले. भाजपा कार्यकर्ता बैठकीला तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांची मोठया संख्येने उपस्थित होती.
सर्वाना विश्वासात घेऊन उमेदवार ठरवावे
आपण सुरवातीला शिवसेना व त्यानंतर स्व. माजी आ. राजेंद्र पाटणी सोबत गेल्या पंधरा वर्षा पासून काम केले आहे. धर्मसत्ता मजबूत करतांना या सोबत राजसत्ताची जोड आवश्यक असल्याने आपण (Bharatiya Janata Party) भाजपाकडून उमेदवारी मिळावी म्हणून शर्यतीत आहे. सर्वाना विश्वासात घेऊन उमेदवार ठरवावा असे महंत जितेंद्र महाराज यांनी आपले मत व्यक्त केले.