काँग्रेस कमेटीची जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीच्या मदतीची मागणी
अमरावती व भातकुली काँग्रेस कमिटीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अमरावती (Bhatkuli Congress Committee) : 16 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट 2025 या दरम्यान अमरावती जिल्ह्यात झालेल्या मुसळधार व ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतीचे, शेतमालाचे, घरांचे व गावागावातील रस्त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, तुर आणि कपाशी या मुख्य पिकांचे 50 टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
अमरावती व भातकुली तालुका काँग्रेस कमेटी (Bhatkuli Congress Committee) व पदाधिकारी यांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने पंचनामे करण्याची आणि शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.

संततधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरले असून, शेतात अजूनही पाणी साचलेले आहे. अनेक गावांमध्ये घरे व गोठे पाण्यात वाहून गेली आहेत. तसेच दळणवळणाचे रस्ते पूर्णपणे विस्कळीत झाल्याने गावोगावील जनजीवन ठप्प झाले आहे. अमरावती व (Bhatkuli Congress Committee) भातकुली काँग्रेस कमेटीने निवेदनात म्हटले आहे की, महसूल व कृषी विभागामार्फत तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना व कुटुंबांना आर्थिक मदत मिळावी. रखडलेले रस्ते दुरुस्त करावेत तसेच नाला खोलीकरण करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. प शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी ऍड. अमित गावंडे,कृ.उ.बा.स. सभापती हरीश मोरे,श्रीकांत बोंडे,प्रवीण मनोहर, हरिभाऊ मोहोड यांच्या नेतृत्वात सचिन कोकाटे,शंतनु निचित, प्रज्वल विघे, सुकुमार खंडारे, सुरेश मोरे, घनश्याम बोबडे, विनोद डांगे, बलवीर चव्हाण, शिल्पा महल्ले,वीरेंद्रसिंह जाधव, शैलेश काळबांडे, गोकुळ तायडे, सतीश गोटे,पंकज देशमुख, दिलीप सोनवणे, शेखर रिठे, मनोज अंबाळकर, हरिश्चंद्र पाटील,अरुण कोकाटे, प्रफुल बदे,चेतन जवंजाळ,बंडूभाऊ पोहकार, अतुल यावलीकर, किशोर बेलकर, गजानन राठोड, गजानन देशमुख,राजू कुर्हेकर, प्रमोद तसरे , मुकद्दर पठाण,अभय वंजारी, निलय कडू,दिनेश ठाकरे, आशुतोष देशमुख, अभय देशमुख, अशोक पारडे, बबलू तायडे, मंगेश माहुरे, अब्दुल वहीद,रोशन झास्कर, अब्दुल खालिक, अशोक चौधरी, सुभाष सातव, गौतम दाभाडे, शुभम निंभोरकर,धम्मानंद गुडघे, दामोदर वानखडे, अमोल गुडघे,खलील भाई, शेख जावेद, प्रभाकर धंदर,संजय कोळसकर,विजय मुंडे,गजानन लांजेवार उपस्थित होते.




