घटना बाह्य कार्यकारी मंडळाचे भ्रष्ट्राचार
आमगाव (Bhavabhuti Education Institute) : आमगाव येथील भवभूती शिक्षण संस्था नोंदणी क्रमांक ५६/६२ येथील घटनाबाह्य संचालक मंडळाने संस्थेच्या विविध जमिनी अवैधपणे विक्री करून आर्थिक भ्रष्ट्राचार केला असल्याचे उघड झाले आहे. या जमीन विक्रीची तक्रार होताच आता विक्री केलेल्या जमिनी परत संस्थेच्या नावाने पुन्हा खरेदी व्यवहार केल्याचे दस्त उघड पडले आहे. त्यामुळे या जमिनीवरील भूखंड खरेदी करणाऱ्या अनेक वेक्तींमध्ये एकच खळबळ माजली आहे.
तक्रार करताच जमिनीची संस्थेला पुन्हा विक्री
आमगाव येथील भवभूती शिक्षण संस्था आमगाव येथील संचालक मंडळाने धर्मदाय आयुक्त यांच्या विना परवानगीने संस्थेची अनेक जमिनी अवैधपणे विक्री करून आर्थिक लाभ घेतला आहे. भवभूती शिक्षण संस्था आमगाव यांची मौजा पदमपुर तालुका आमगाव येथील गट क्रमांक ४१९/क आराजी ०.७५ व ४३०/ब/१ आराजी ०.४३ अशी एकूण आराजी १.१८ जमीन संस्थेच्या संचालक मंडळाने परस्पर संगनमताने आर्थिक लाभ उचलण्यासाठी २४ जानेवारी २०२४ ला खरेदीदार महेंद्र हेतराम पारधी ,विनोद पालिराम रहांगडाले, रेवेंद्र इंसाराम बिसेन,राहुल भैयालाल कटरे राहनार तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया यांना ६८ लक्ष रुपये किंमतीत विक्री पत्र लिहून देण्यात आले.
विनोद पालिराम रहांगडाले, रेवेंद्र इंसाराम बिसेन,राहुल भैयालाल कटरे राहनार तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया यांना ६८ लक्ष रुपये किंमतीत विक्री पत्र लिहून देण्यात आले.याची माहिती काही आजीव सदस्य यांना माहिती होताच त्यांनी सहायक धर्मादाय आयुक्त नागपूर व सहाय्यक धर्मादाय आयुक्त गोंदिया यांच्याकडे तक्रार व प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले. त्यामुळे संस्थेच्या संचालक मंडळात एकच खळबळ उडाली. त्यांनी यातून मार्ग काढताना सदर मौजा पदमपुर येथील जमीन उलट त्याच किंमतीत दिनांक २७जुलै २०२४ ला सदर विक्री पत्र रद्द करून संस्थेच्या नावाने खरेदी करण्यात आले.
धर्मदाय आयुक्तकडे तक्रार
सदर जमीन खरेदीदार विनोद पालीराम रहांगडाले व इतर यांनी सदर जमिनीची विक्री २४ जानेवारी २०२४ केली होती,या जमिनीचे अवघे सहा महिन्यातच त्या भूखंडावरील प्लाट पाडून जवळपास पूर्ण अनेकांना काही रोख रक्कम घेऊन विक्री पत्र लिहून देण्यात आले होते . परंतु विक्री झालेली जमीनीचें विक्री दस्तच रद्द झाले आहे.आता या जमिनीचे विक्री पत्र लिहून देणारे व भूखंड घेणाऱ्यांना आपली फसवणूक झाल्याची माहिती मिळाली आहे.
विशेष म्हणजे संचालक मंडळाने जाणीवपूर्वक या जमिनी परस्पर विक्री करण्याचा हेतू साध्य करण्यासाठी संस्थेच्या अनेक जमिनी अद्यापही संस्थेच्या अनुसूची १ मध्ये नोंद करण्यात आले नाही. व त्या जमिनी परस्पर विक्री व्यवहार करण्यात आले आहे. आता प्रकरण न्यायप्रविष्ठ झाल्याने सर्वांची झोप उडाली आहे. आता या संस्थेच्या जमिनीवर भूखंड घेणाऱ्यांनी सरळ पोलीस स्टेशन दाखल करून फसवणुकीची माहिती देण्यात आले. यावर आता काय कार्यवाही होणार याकडे लक्ष लागले आहे,विशेष म्हणजे यापूर्वीही सदर जमीन संस्थेतील अनेक कर्मचाऱ्यांना विक्री करून आर्थिक व्यवहार करण्यात आले होते परंतु कालांतराने या जमिनीवरील भूखंड त्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले नाही अशी माहिती काही कर्मचार्यांनी दिली आहे. व आज तेही याबाबद तक्रार करणार अशी माहिती दिली आहे.